JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दहीहंडीचा थरार ठरला क्षणिक, 22 वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू, सातव्या थरावरून असा कोसळला, VIDEO

दहीहंडीचा थरार ठरला क्षणिक, 22 वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू, सातव्या थरावरून असा कोसळला, VIDEO

मुंबईमध्ये शुक्रवारी मोठ्या उत्साहामध्ये दहीहंडीचा (Mumbai Dahi Handi) उत्सव साजरा करण्यात आला. दहीहंडीच्या या उत्सवाला दोन दिवसांनी म्हणजेच सोमवारी गालबोट लागलं. 22 वर्षांचा गोविंदा संदेश दळवी (Mumbai Govinda Death) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 ऑगस्ट : मुंबईमध्ये शुक्रवारी मोठ्या उत्साहामध्ये दहीहंडीचा (Mumbai Dahi Handi) उत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं, पण दहीहंडीच्या या उत्सवाला दोन दिवसांनी म्हणजेच सोमवारी गालबोट लागलं. 22 वर्षांचा गोविंदा संदेश दळवी (Mumbai Govinda Death) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवशंभो गोविंदा पथकाचा संदेश प्रकाश दळवी हा विलेपार्लेमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी सातव्या थरावर चढला, पण त्याचा पाय सटकला आणि तो खाली पडला. संदेश दळवी हा सातव्या थरावरून कसा कोसळला, याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. मेंदूला दुखापत झाल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले, पण डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. 22 वर्षांचा संदेश दळवीच्या घरात आई-वडील आणि तीन भावंडं आहेत. मूळचा पार्ल्याचा असलेला संदेश सध्या कुर्ल्याला राहत होता.

दरम्यान क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी गोविंदाच्या मृत्यूबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संदेश दळवीचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. दोन दिवस त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याच्या कुटुंबियांनी त्याला आज नानावटीला नेलं. हा गोविंदा गरीब कुटुंबातील आहे. आम्ही त्याला 10 लाखांची मदत तर देणार आहोतच, पण त्याच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी सरकार पूर्ण सहकार्य करेल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिली आहे. कुटुंबियांच्या आग्रहामुळे त्याला नानावटी रुग्णालयात नेण्यात आलं. आवश्यकता असेल तर या पूर्ण घटनेची चौकशी केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी मंडळासोबत आज चर्चा केली. नियमावलीचं पालन झालं का नाही, याची चौकशी केली जाईल, असंही गिरीश महाजन म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या