JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dadar parking : दादरमधील पार्किंगची समस्या मिटणार वॅले पार्किंग संकल्पनेला सुरूवात

Dadar parking : दादरमधील पार्किंगची समस्या मिटणार वॅले पार्किंग संकल्पनेला सुरूवात

दादरमध्ये पार्किंगच्या समस्येला नागरिक रोज सामोरे जात असतात माञ गाडी लावावी कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. काही अंशी हा प्रश्न सुटणार आहे. (Dadar parking)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 मे : मुंबईमध्ये कोणत्याही भागात गेल्यावर पहिल्यांदा आपल्याला समस्या जाणवते ती म्हणजे गर्दी, लोकल असो अगर भाजीमंडई, यासगळ्यात मोठी समस्या म्हणजे आपल्या वाहनांची पार्किंग सुविधा. मुंबईच्या कोणत्याही भागात गेल्यावर आपल्याला पहिल्यांदा पार्किंग सुविधा पहावी लागते. दरम्यान मुंबईचा मुख्य भाग समजल्या जाणाऱ्या दादरमध्येही या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान पालिकेच्या आणि दादर व्यापारी संघाच्यावतीने वॅले पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे.

दादर हा भाग नेहमीच गजबजलेला असतो. विविध दुकाने या भागात असल्याने दररोज हजारो लोक दादरला भेट देत असतात. माञ पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर तोडगा म्हणून महापालिका आणि दादर व्यापारी संघातर्फे वॅले पार्किंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. बाकीच्या परिसरात देखील आशा प्रकारची सुविधा सुरू करण्यात यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान वॅले पार्किंगची सुविधा सगळीकडे झाल्यास लोकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता होणार आहे.

हे ही वाचा :  अभिमानास्पद! 26 वर्षीय कॅप्टन अभिलाषा आर्मीतल्या पहिल्या महिला लढाऊ हेलिकॉप्टर चालक, लष्कराने केला असा सन्मान

वॅले पार्किंगसाठी नागरिकांकडून शुल्क आकारण्यात येणार आहे. 4 तासाला 100 रुपये प्रमाणे हा दर लावण्यात आला आहे. दरम्यान दादरमध्ये दररोज हजारो लोक येत असल्याने पार्किंगच्या समस्येला सामोरे जात असतात माञ गाडी लावावी कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. काही अंशी हा प्रश्न सुटणार आहे. यामुळे शुल्क आकारून असावे पण पार्किंग असले पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

जाहिरात

काय म्हणतात स्थायिक

फिलिप लासराडो म्हणाले की दररोज इतकी गर्दी असते की पार्किंगसाठी जागा मिळणे ही कठीण होऊन बसते. पार्किंगला जागा मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. यावर पालिकेने तोडगा काढावा

काय म्हणतात व्यापारी संघाचे अध्यक्ष

व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील शाह म्हणाले की दादरमद्ये इतकी गर्दी असते की पार्किंग ची समस्या निर्माण होऊन बसते. यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करून व्हॅले पार्किंग ची सुरुवात केली आहे. साहजिकच यातून लोकांना फायदा होणार आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या