JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Monsoon Return Rain : हुश्श् मान्सूनच्या परतीची एकदाची तारीख ठरली… पुढच्या दोन दिवसांत पाऊस थांबणार

Monsoon Return Rain : हुश्श् मान्सूनच्या परतीची एकदाची तारीख ठरली… पुढच्या दोन दिवसांत पाऊस थांबणार

उत्तर महाराष्ट्रातून थांबलेल्या मान्सून या आठवड्याच्या अखेरीस परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑक्टोंबर : मागच्या काही दिवसांपासून मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे बोलले जात होते परंतु परतीच्या पावसाने धुमाकूळ घातले आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रातून थांबलेल्या मान्सून या आठवड्याच्या अखेरीस परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

मागच्या 10 दिवसांपासून उत्तरकाशी, नझीयाबाद, आग्रा, ग्वाल्हेर, रतलाम आणि भरुचमधून मान्सून परतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. पुढील 3 ते 4 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील प्रदेशातून परण्याची शक्यता असल्याचे असे IMD ने  दिलेल्या अहवालात सांगितले आहे.

हे ही वाचा :  तुळशीचे मूळ संपवेल तुमच्या अडचणींचे मूळ; या पद्धतीनं करून बघा धार्मिक उपाय

संबंधित बातम्या

या महिन्यातील 14 आणि 15 तारखेपर्यंत उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंत राज्यात मान्सून कमी झालेला दिसेल. तर पुढच्या दोन दिवसांत महाराष्ट्र, छत्तीसगड आणि झारखंडच्या बहुतांश भागांतून मान्सून परतीची वाटचाल करणार आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांत भारतातील काही भागात परतीच्या मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिमेत होत असलेल्या वादळामुळे मान्सून पुन्हा सक्रीय झाला होता परंतु मागच्या दोन दिवसांत त्याची तिव्रता कमी झाल्याचे दिसून येत असल्याचे पुणे वेदशाळेतील अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

IMD च्या दिलेल्या माहितीनुसार, वायव्य आणि उत्तर भारतात परतीच्या पाऊस पूर्णपणे थांबेल. तसेच 14-15 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातून पाऊस थांबणार असल्याचे सांगण्यात आले. दक्षिण भारतातील काही प्रदेश वगळता उर्वरित देशात या महिन्याच्या सुरुवातीपासून अतिरिक्त पाऊस झाला आहे. उत्तर प्रदेश (696%), उत्तराखंड (539%), हरियाणा (577%), दिल्ली (625%) आणि मध्य प्रदेश (301% टक्के) पाऊस झाला आहे.

जाहिरात

मान्सूनच्या माघारीस पोषक स्थिती

मान्सून वायव्य भारतातून 3 ऑक्टोबर रोजी परतल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. परतीच्या वाटचालीत मान्सूनची उत्तरकाशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंतची सीमा तब्बल आठवड्यानंतरही मंगळवारी (ता. 11) कायम होती. माघारीस पोषक वातावरण होत असल्याने चार ते पाच दिवसांत मध्य भारताच्या काही भागातून मान्सून गायब होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

जाहिरात

हे ही वाचा :  पावसामुळे पिकांची नासाडी? काळजी करू नये, ताबडतोब विम्याचा क्लेम करा, ही आहे पद्धत

बंगालच्या उपसागरात मध्यवर्ती भागावर असलेल्या हवेच्या दाबामुळे 10 ते12 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात पावसाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत हवेच्या दाबाचा हा पट्टा पश्चिम किंवा वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता आहे. हा पट्टा दक्षिण विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि आसपासच्या भागातून पुढे जाऊ शकतो.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या