JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोरोनाचा संसर्ग रोखणारा अनोखा ट्रॅक्टर, नाशिकच्या शेतकऱ्याचं मोदींकडून कौतुक

कोरोनाचा संसर्ग रोखणारा अनोखा ट्रॅक्टर, नाशिकच्या शेतकऱ्याचं मोदींकडून कौतुक

राजेंद्र हे नाशिकमधील सतना गावचे शेतकरी आहेत. त्यांनी कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी अनोखी मोहीम राबवली

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना unlock 1.0 सुरू होण्याआधी रविवारी 65 व्या मन की बातमध्ये नाशिकमधील शेतकऱ्याचं कौतुक केलं आहे. नाशिकच्या सतना गावातील शेतकरी राजेंद्र यादव यांनी आपल्या गावात कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी अनोखी मोहीम राबल्याचं सांगितलं आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील शेतकरी आणि व्यावसायिक असलेले राजेंद्र जाधव संशोधक आहेत. त्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अनोखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सॅनिटायझर फवारणी यंत्र विकसित केलं. या यंत्रामुळे कोरोनाच्या लढ्यासाठी मोठी मदत झाली झाली आहे. रस्ते, वसाहती, लिफ्ट, घरांचे दरवाजे, कंपाऊंड गेट, भिंती आदींना आपला स्पर्श झाल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही मार्गाने स्पर्श होणाऱ्या विविध जागांवर निर्जंतुकीकरण करून संसर्ग टाळणे शक्य आहे. मनुष्यबळाचा वापर न करता झपाट्याने फैलावत असणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी संभाव्य संसर्ग असलेल्या जागांची तातडीने फवारणी करणं गरजेचं असतं.

वऱ्हाणे ता. बागलाण येथील शेतकरी, संशोधक राजेंद्र जाधव यांनी त्यांच्या शेतातील पिकांवर फवारणीसाठी यंत्र निर्मित केले होते. त्या यंत्राची उपयुक्तता तपासून कोरोना संकट काळात त्यांनी हे यंत्र सटाणा नगरपरिषदेला वापरासाठी दिले. आरोग्य खात्याच्या मानकाप्रमाणे ह्या यंत्रामुळे कोरोना निर्जंतुकीकरणाच्या लढाईला मोठे बळ मिळाले. कोरोना संसर्गाच्या कठीण परिस्थितीत सॅनिटायझेशनसाठी ह्या यंत्रामुळे आत्मनिर्भरतेची शिकवण मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बातमधील महत्त्वाचे मुद्दे - माझ्या मनाला स्पर्श करणारी आणखी एक गोष्ट ही की, संकटाच्या या काळात सर्व देशवासीय, खेड्यांपासून शहरं, आमच्या छोट्या व्यापाऱ्यांपासून ते स्टार्टअपपर्यंत, आपल्या लॅबमध्ये कोरोनाविरूद्धच्या लढाईत नवीन मार्ग शोधून काढले जात आहेत. -इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोनाला रोखण्यात पुढे आहे -देशात एकजुटीने कोरोना विरोधात लढा सुरू आहे -संकटाच्या काळात झालेल्या संशोधनाचं मोदींकडून कौतुक -देशाच्या सामूहित शक्तीमुळे कोरोनाला रोखण्यात यश - याशिवाय स्वदेशी वस्तुंना उद्योगांना चालना मिळत आहे. संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या