JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Eknath Shinde : शिंदे गटातील आमदार नाराज? मुख्यमंत्री शिंदेंची बंद दाराआड आमदारांची मनधरणी

Eknath Shinde : शिंदे गटातील आमदार नाराज? मुख्यमंत्री शिंदेंची बंद दाराआड आमदारांची मनधरणी

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांपैकी काही नाराज असल्याच्या चर्चा वारंवार येत असल्याने सरकार अस्थिर आहे का याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 नोव्हेंबर : महाविकास आघाडीला सत्तेतून पाय उतार करत एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडत राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण दिलं. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांपैकी काही नाराज असल्याच्या चर्चा वारंवार येत असल्याने सरकार अस्थिर आहे का याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनीनी सरकार लवकरच कोसळेल असे वक्तव्य केल्याने चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचीही चर्चा आहे. या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समजूत काढत असल्याचे दिसून येत आहे.

मागच्या काही दिवसांपूर्वी बच्चू कडू शिंदे सरकारवर नाराज असल्याच्या बातम्या झळकत होत्या यावरून सरकारमध्ये अस्थिरता आहे का असा सवाल उपस्थित केला जात होता. यानंतर शिंदे गटाचे पहिल्या फळीतील आमदार संजय शिरसाट नाराज असल्याचे बोलले जात होते. या दोन आमदारांनी आम्ही नाराज नसल्याचे सांगितल्याने सर्व काही सुरळीत असल्याचे बोलले जात असतानाच पुन्हा एकदा शिंदे गटात धुसफूस सुरू असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा :  शरद पवारांच्या विश्वासू माणसाचा राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’, शिंदे गटात करणार प्रवेश

संबंधित बातम्या

नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या नाराज असल्याचा प्रकार समोर आलाय. त्यांची देखील नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती मिळत आहे.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आपल्याला बैठकांना बोलवत नाहीत. आपल्याला न विचारता पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते, अशी खदखद व्यक्त करत सुहास कांदे यांनी आपली उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या नाराजीनंतर शिंदे गटात गोलमाल है भाई गोलमाल है असे बोलले जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची दखल घेतल्याचे बोलले जात आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश, दोन्ही गटांसाठी ही तारीख ठरणार महत्त्वाची

सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सविस्तर केल्याचे समजते आहे. या भेटीत मुख्यमंत्री आणि कांदे यांच्यात बंद दाराआड महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, या विषयीची माहिती समोर आली नसली तरी सुहास कांदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. पण या बैठकीत कांदे यांनी पालकमंत्री आपल्याला बैठकांना बोलवत नसल्याची तक्रार केल्याची चर्चा आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या