04 जुलै: बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड तालुक्यातील बाळसमुद्र या छोट्याशा गावातील मेरत कुटुंबाला यंदाच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. परसराव उत्तमराव मेरत ( वय ४२) व त्यांच्या सुविद्य पत्नी अनुसया (वय ४२) अशी या भाग्यवंत दांपत्य वारकऱ्यांची नावं आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी पहाटे विठ्ठलाची पूजा केली. व्यवसायाने शेतकरी असलेले गरीब घरातील मेरत दांपत्य गेल्या दहा वर्षापासून ते वारी करतात तर गेल्या तीन वर्षापासून ते वारीत माउलींच्या पालखीसह पायी सहभागी होत आहेत.