ठाणे, 04 एप्रिल: ठाणे जिल्ह्यातल्या (Thane district) कसारा रेल्वेस्थानका (Kasara railway station) दरम्यान मोठी दुर्घटना (major accident) टळली आहे. या दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ बघून अंगावर नक्कीच काटा उभा राहिल. या व्हिडिओत भरधाव वेगात येणाऱ्या एक्स्प्रेसची धडक एक टेम्पोला (tempo) बसल्याचं दिसतंय. पण सुदैवानं काही अंतरानं तो टेम्पो मागे असल्यानं मोठी दुर्घटना होता होता वाचली. भरधाव वेगात येणाऱ्या एक्स्प्रेस गाडीची धडक या टेम्पोला बसणा होती. पण टेम्पो थोडा अंतरानं मागे असल्यानं अपघात होणं थोडक्यात टळलं. नेमकी कशी घडली घटना 2 एप्रिल रोजी संध्याकाळी आसनगाव ते आटगाव दरम्यानचे रेल्वे क्रॉसिंग फाटक बंद करण्यात आलं होतं. मात्र हे फाटक तोडून टेम्पो रुळ ओलांडणार होता आणि समोरुन एक्स्प्रेस येत होती. पण त्याच दरम्यान प्रत्यक्षात टेम्पो चालकाचं टेम्पोवरील नियंत्रण सुटलं आणि समोरून वेगात एक्स्प्रेस गेली.
पण सुदैवानं टेम्पो जरा मागे असल्यानं मोठा अपघात टळला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.