JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, जिल्ह्याला 16 तारखेपर्यंत RED ALERT

रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, जिल्ह्याला 16 तारखेपर्यंत RED ALERT

IMD issues Red Alert for Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिवाजी गोरे, प्रतिनिधी रत्नागिरी, 13 जुलै : कोकणात मुसळधार (Heavy Rain) ते अति मुसळधार पाऊस (Heavy to Heavy Rainfall) पडण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला असून रत्नागिरी जिल्ह्याचा (Ratnagiri) अतिवृष्टीचा इशारा कायम कायम आहे. राजापूर (Rajapur) आणि संगमेश्वर (Sangameshwar) या तालुक्यातील पूर ओसरला आहे. परंतु या ठिकाणचा धोका मात्र कायम आहे. 16 तारखेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही भागात रात्री तर काही भागात सकाळपासूनच तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु आज दिवसभर धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेली दोन दिवस धो-धो कोसळणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. काही नद्यांनी धोक्याची पातळी सुद्धा ओलांडली होती परंतु रात्री जिल्ह्यात थोडेफार प्रमाणात उसंत दिल्याने जिल्ह्याचा धोका टळला आहे. राजापूर शहराचा पूराचा विळखा सुद्धा सुटला आहे. तसेच संगमेश्वर तालुक्यातील गड नदी, शास्त्री नदी आणि राजापूर तालुक्यातील अर्जुना, कोदवली या नद्यांचा धोका टळला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांच्या समित्या स्थापन सायंकाळी वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे चिपळून शहराला आणि खेड जगबुडी नदीने धोक्याची पातळी वाढल्याने खेड शिराला धोका निर्माण झाला होता. परंतु पावसाने थोडीफार विश्रांती घेतल्याने या नद्या आटोक्यात आहेत. जिल्ह्यातील पुरुसदृश्य परिस्थिती नियंत्रणात आली आहे. रात्री जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडला तर सकाळपासूनच काही भागांमध्ये तुरळक सरी पुन्हा सुरू झाले आहेत. रायगडमध्येही पूरस्थिती रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी धोक्याच्या पातळी ओलांडून वाहत आहे. कालपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे आणि नद्या नाले भरून वाहत आहे. जिल्हा प्रशासनने नदीकाठच्या गावांना सतर्क चा इशारा दिला आहे. काम असेल तरच घराबाहेर पडा अशाही नागरिकांना सांगण्यात आलं आहे. कालपासून जनजीवन विस्कळीत झाली आहे. आता पावसाचा जोर कमी झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या