JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / पुढचे 5 दिवस असणार आसमानी संकट, या भागात हवामान खात्याचा इशारा

पुढचे 5 दिवस असणार आसमानी संकट, या भागात हवामान खात्याचा इशारा

15 ऑगस्टला म्हणजे विकेंडला राज्यात आसमानी संकट असणार आहे.

0108

राज्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम आहे. अशात 15 ऑगस्टला म्हणजे विकेंडला राज्यात आसमानी संकट असणार आहे.

जाहिरात
0208

येत्या पाच दिवसात कोकण, गोवा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

जाहिरात
0308

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्याने जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

जाहिरात
0408

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, एक्सप्रेस हायवेवरही मुसळधार पावसाने दरडीही कोसळू शकतात अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे.

जाहिरात
0508

आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगष्टमध्ये माञ जोरदार बँटिग सुरू केली.

जाहिरात
0608

गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उजनीचा अपवाद वगळता बहुतांश धरणं 75 टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.

जाहिरात
0708

पाऊसमान चांगलं असंल तर सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात आणि सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते.

जाहिरात
0808

पण यंदा मात्र, जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सूनने सर्वदूर बँटिग सुरू केली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या