JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोरोनाचा विळखा होतोय सैल; बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या मोठी, रिकव्हरी रेटही वाढला

कोरोनाचा विळखा होतोय सैल; बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या मोठी, रिकव्हरी रेटही वाढला

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागला असून रिकव्हरी रेट वाढत असल्याचं पहायला मिळत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 मे: राज्यात (Maharashtra) गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना (Corona) रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचं पहायला मिळत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट (Covid cases decreased) होत आहे तर त्याच दरम्यान कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी राज्याचा रिकव्हरी रेट वाढत आहे आणि राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात आज 58,805 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 46,00,196 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.01 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 46,781 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात सध्यस्थितीत एकूण 5,46,129 सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,01,00,958 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 52,26,710 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 36,13,000 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,417 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कुठल्या विभागात आज किती रुग्णांचे निदान? ठाणे - 6818 नाशिक - 6494 पुणे - 12903 कोल्हापूर - 5073 औरंगाबाद - 2159 लातूर - 2908 अकोला - 5042 नागूपर - 5384 एकूण - 46781 Maharashtra Lockdown: राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचा निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत कठोर निर्बंध लागू होणार कुठल्या जिल्ह्यात किती रुग्ण याची माहिती

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई६८१२३३६२८७८६१३९७२१८८०३६५९५
ठाणे५४२५७२५०३६९६७४९८३१३१३४७
पालघर१०४३८०८७७७८१२७५१०१५३१७
रायगड१३५४४४१२३८५६२३६५९२२१
रत्नागिरी३२३२३२१३१८६०९१०३९४
सिंधुदुर्ग१८२७११२६०५४३९५२२४
पुणे९४८०१०८३४७०९१०१७६५८१०३०६७
सातारा१२८६०९१०२००४२५१३१२२४०८०
सांगली९९७९६७८३८०२३०२१९११२
१०कोल्हापूर८४४७३६३५६७२०४०१८८६३
११सोलापूर१३१७४९१०७१७३३०६२५९२१४५५
१२नाशिक३५७७८३३३११०७३८८७२२७८८
१३अहमदनगर२१२३३२१८३७०४२३७१२६२५६
१४जळगाव१२९४३४११५६९५२१०६३२११६०१
१५नंदूरबार३७३७३३३९९२६८८२६९१
१६धुळे४१२०७३७३८३४९३१२३३१९
१७औरंगाबाद१३६७०४१२५१३४२१९११४९३६५
१८जालना५२०३४४४१८५८०२७०४६
१९बीड७१३७५५२४१२१२३८१७७१६
२०लातूर८२९४२७१४६७१४१७१००५४
२१परभणी४५१०४३८०५७७३९११६२९७
२२हिंगोली१५९५११३९०७२३७१८०७
२३नांदेड८७०१८८००००१९१२५०९८
२४उस्मानाबाद४७४३६३९६७८११२३४८६५८७
२५अमरावती७४८८४६२८६३१११४१०९०५
२६अकोला४७१४७४०९०१७४७५४९५
२७वाशिम३३१२३२८६१०४०९४१०१
२८बुलढाणा६४३१३५७८५७४१६६०३५
२९यवतमाळ६२३४०५४७१४११४७६४७५
३०नागपूर४७१८०३४१६६४४५७६८४६४९३४५
३१वर्धा५१७६६४३४३३६८३८३७५६७
३२भंडारा५६९८१५१११८५८४५२७२
३३गोंदिया३८०५५३३०८७३९५४५६७
३४चंद्रपूर७७६७०५९१०५९२४१७६३९
३५गडचिरोली२४९२९२१२७१२४७३४०२
इतर राज्ये/ देश१४६११८२६
एकूण५२२६७१०४६००१९६७८००७२३७८५४६१२९

आज राज्यात 816 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 387 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 193 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 236 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.49 टक्के इतका झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या