JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Rain Update : राज्यातील काही भागात पावसाची सुट्टी पण, विदर्भ, मुंबई पुण्यात पावसाचा अंदाज वेगळा

Maharashtra Rain Update : राज्यातील काही भागात पावसाची सुट्टी पण, विदर्भ, मुंबई पुण्यात पावसाचा अंदाज वेगळा

विदर्भात पावसाने कित्येक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान मुंबई आणि पुण्यात पावसाची उघडझाप असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जुलै : राज्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातले आहे. राज्यात कोकण आणि विदर्भात सध्या पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान कोकणातही पावसाचा जोर ओसरला असला तरी विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाने कित्येक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान मुंबई आणि पुण्यात पावसाची उघडझाप असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. (Maharashtra Rain Update)

विदर्भ आणि परिसरावर असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत मागच्या 24 तासांत संततधार पावसाने हजेरी लावली. विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने दणका दिला. त्यामुळे दाणादाण झाली आहे. मंगळवारी (ता. 19) राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा :  शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यासाठी आमदारांकडे 100 कोटींची मागणी, 4 जणांना अटक, 3 आमदार लागले होते गळाला!

संबंधित बातम्या

ओडिशा आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाकडे सरकल्याने राज्यात दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. अकोल्यातील वाण प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर पूर्णा नदीला पूर आल्याने अकोला- अकोट मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदूरबार, नाशिक जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा ओसरला, तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. मराठवाड्यात पावसाचा जोर काहीसा कमी असल्याचे दिसून आले. मंगळवारी (ता. 19) सकाळपासून राज्याच्या अनेक भागात पावसाची उघडीप दिसून आली. अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता.

जाहिरात

राज्यात मागच्या 24 तासांत कोकण पालघर : जव्हार 52, विक्रमगड 72. रायगड: कर्जत 86, खालापूर 42. ठाणे आंबरनाथ 38, भिवंडी 37, कल्याण 30, मुरबाड 36, शहापूर 88.

हे ही वाचा :  एकनाथ शिंदेंची सुलतानाशी तुलना, खासदार फोडल्यानंतर शिवसेनेची संतप्त प्रतिक्रिया

मध्य महाराष्ट्र धुळे 35 शिरपूर 37. जळगाव: अंमळनेर 38, भाडगाव 32, भुसावळ 32, बोधवड 42, धरणगाव 35, एरंडोल 39, जळगाव 33, मुक्ताईनगर 50,. नंदूरबार अक्कलकुवा 54, शहादा 47, तळोदा 67. नाशिक दिंडोरी 40 हर्सल 58, इगतपुरी 71, ओझरखेडा 36, पेठ 100, पिंपळगाव संवत 39, सुरगाणा 50, त्र्यंबकेश्वर 31.

जाहिरात

विदर्भ अकोला 34, अकोट 48, बाळापूर 31, बार्शी 31, मूर्तिजापूर 43, तेल्हारा 54. अमरावती 31, अंजनगाव 47, बटकुली 37, चांदूरबाजार 41, चिखलदरा 68, दर्यापूर 46, धामणगाव रेल्वे 44, नांदगाव काझी 50, परतवाडा 38. बुलडाणा : जामोद 38, मलकापूर 34, संग्रामपूर 53, शेगाव 31. वर्धा : आर्वी

42, देवळी 56, हिंगणघाट 47, खारंघा 50, समुद्रपूर 48, सेलू 48, वर्धा 61. वाशीम करंजालाड 50. यवतमाळ : बाभुळगाव 51, दारव्हा 33, कळंब 44, नेर 51 पाऊस पडला.  

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या