महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज पुन्हा एकदा एका पक्षामध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीमध्ये आज शरद पवार आणि अजित पवार असे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. अजित पवार यांच्यासोबत किती आमदारांचा पाठिंबा आहे आणि शरद पवार यांच्या बाजूने किती आमदार आहे, हे चित्र आज स्पष्ट होणार आहे.
त्यावेळी संपूर्ण मैदान भुजबळ साहेबांनी गाजवले.
मला फक्त ७ जील्ह्याचे खातं दिले.
मी सकाळी लवकर उठतो रात्री उशिरापर्यंत का करतो का तर महाराष्ट्र पुढे गेले पाहीजे.
मी खूप छोटा कार्यकर्ता होतो. पण माझा प्रशासनावरची पकड कशी आरे सगळ्यांना माहिती आहेऱ्
– संधी आली होती. तेंव्हा मिळाली असती तर आज राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता
राष्ट्रवादी मधील लढा निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला अलीकडच्या घडामोडींची माहिती दिली.
महाराष्ट्रात शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांना बडतर्फ केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिली होती.
शरद पवार घेणार पहिली सभा नाशिकमध्ये
छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात शरद पवार घेणार सभा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडा नंतर शरद पवार यांची राज्यातील पहिली सभा
छगन भुजबळ हे शरद पवारांचे एकेकाळाचे खंदे समर्थक
गोंदिया जिल्ह्याचे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपल्या मतदारसंघात लावले फोटो
अजित पवार यांना आपल्या कडून शुभेच्छा देणारे फलक संपूर्ण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात लावले आहे.
पवारांनी विरोध केला असतानाही आमदाराने लावला शरद पवारांचा फोटो
आमदार म्हणतात शरद पवार बदल आम्हला आदर आहे
आमदारांनी केलं अजित पवार गटाला समर्थन