JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bhandara: पाणी पिण्यासाठी STतून खाली उतरला पुण्यातील सराफ, तितक्यात 30 लाखांचे सोनं असलेली बॅग चोरट्यांनी केली लंपास, पाहा CCTV

Bhandara: पाणी पिण्यासाठी STतून खाली उतरला पुण्यातील सराफ, तितक्यात 30 लाखांचे सोनं असलेली बॅग चोरट्यांनी केली लंपास, पाहा CCTV

Bag stolen from ST bus: सोन्याच्या दागिन्यांने भरलेली बॅग एसटीमधून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. भंडाऱ्यातील साकोली बस स्थानकात ही घटना घडली आहे.

जाहिरात

CCTV: पुण्यातील सराफाला पाण्याची बाटली पडली 30 लाखांना, STतून उतरताच घडला भयंकर प्रकार

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 7 जून : पाण्याची बाटली घेण्यासाठी बस खाली उतरणे एका पुणे येथील सराफा व्यापाऱ्याच्या दिवाणजीला चांगलेच महागात पडले आहे. सोन्याची बिस्किटे असेलेली बॅग एसटीतून लंपास केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara district) साकोली बसस्थानकावर (Sakoli ST bus station) घडली आहे. या बॅगमध्ये तब्बल 30 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते. (bag worth rs 30 lakh gold ornaments stolen from ST) तीन चोरट्यांनी बॅग लंपास केल्याचा संशय आहे. याप्रकरणी साकोली ठाण्यात रात्री तक्रार दिल्यानंतर सीसीटीव्हीच्या (Incident caught in CCTV) आधारे चोरट्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. 30 लाखांचे सोने लंपास चोरी झालेल्या बॅगेत 25 लाख 93 हजार रुपये किमतीचे 471 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. त्यासोबतच 4 लाखांची 82 ग्रॅम सोन्याची बिस्किटे सुद्धा होती. तब्बल 30 लाख रुपयांची सोन्याचे दागिने असेलेली बॅग एसटीतून लंपास झाली आहे. राजेंद्रसिंग जसवंतसिंग राठोड वय 24 वर्ष (रा. नागाने, राजस्थान) असे दिवाणजीचे नाव असून, ते पुणे येथील भवरलाल त्रिलोकचंद अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्ममध्ये कार्यरत आहेत.

संबंधित बातम्या

30 मे च्या रोजी जवळपास 30 ते 35 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे घेऊन ते निघाले होते. दरम्यान रायपूर, राजनगाव, बालाघाट आणि गोंदिया येथील सराफांना दागिने देऊन गोंदियावरून ते भंडारा येथे जाण्यासाठी सायंकाळी बसमध्ये बसले. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बस साकोली बसस्थानकावर आली आणि त्यावेळी ही घटना घडली. वाचा :  ‘‘माझे हात सोडा…’’, चोर समजून 17 वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण; ठाण्यातला धक्कादायक प्रकार तहान लागल्याने बॅग बसमध्येच ठेवून पाण्याची बाटली घेण्यासाठी दिवानजी खाली उतरला. बसमध्ये आल्यानंतर पाहतो तर सीटवरील बॅग गायब झाली होती. घाबरलेल्या स्थितीत खाली उतरुन त्याने तत्काळ आपल्या मालकाला फोन करुन घडलेली हकीकत सांगितली. लागलीच साकोली ठाणे गाठले असता याप्रकरणी पोलिसांनी संपूर्ण चौकशी करून उशिरा रात्री गुन्हा नोंदविला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या टीम रवाना करण्यात आल्या आहे. दिवाणजीला पोलिसांनी तक्रारीनंतर साकोलीत थांबवून घेतले. त्याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या