JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nitin Raut: राज्यावर वीजेचे संकट कायम, पुढील दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे मोठे विधान

Nitin Raut: राज्यावर वीजेचे संकट कायम, पुढील दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे मोठे विधान

Maharashtra News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने वाढ झाल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता राज्यावर नवं संकट घोंगावत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मार्च : राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे (Maharashtra Electricity department strike called off) घेण्यात आला आहे. वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे राज्यातील वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती (Power supply may affect) व्यक्त करण्यात येत होती. पण संप मागे घेण्यात आल्याने दिलासा मिळाला असतानाच आता नवं संकट राज्यावर घोंगावत आहे. पुढील दोन दिवस संकटाचे असल्याचं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी केलं आहे. पुढचे दोन दिवस संकटाचे आहेत असं वक्तव्य नितीन राऊत यांनी केलं आहे. पण हे संकट नेमकं कसलं आहे? भारनियमन म्हणजेच लोडशेडिंग होणार का? राज्यातील विद्यार्थ्यांना अंधारातच अभ्यास करावा लागणार का? यासंदर्भात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सर्व उत्तरे दिली आहेत. पुढील 2 दिवस कठीण ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, हे राज्य अंधारात बुडू देणार नाही. विजेच्या क्षेत्रात सर्कस करावी लागते. पुढचे 2 दिवस कठीण आहेत. दोन दिवस कोळशाचा पुरवठा होऊ शकला नाही, त्याचे परिणाम होऊ शकतात. पण भारनियमन होणार नाही. गरज पडली तर पॉवर एक्सचेंजमधून वीज विकत घेऊ. वाचा :  महावितरण अधिकाऱ्याला धमकावणं भाजप आमदाराला महागात पडणार? ठाकरे सरकारने दिले ‘हे’ आदेश कोळशाचं नियोजन करावं लागणार नितीन राऊत पुढे म्हणाले, हा युद्धाचा काळ आहे, युद्धाच्या काळात सगळ्या आयुधांचा वापर केला जातो. राज्यात लोडशेडिंग होऊ द्यायचं की नाही हे एक युद्ध आहे. रोज 1500 हजार ते अडीच हजार मेगावॅट वीज खरेदी करावी लागतेय. कधी 3 ते 8 रुपयांनी वीज खरेदी केली जाते, मागच्या वेळी 20 रुपये प्रति युनिट खर्च केला गेला. येत्या 2 दिवसांत कोळशाचं नियोजन करावं लागेल, कुठे किती कोळसा द्यायचा हे ठरवावं लागेल. राज्यात उष्णतेची लाट गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. तापमानाचा पार सतत चढता असल्याचं दिसत आहे. पुढील चार दिवस राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला असतानाच दुसरं संकट महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे आणि ते म्हणजे वीज पुरवठा खंडित होण्याचं. राज्यातील कोळसा पुरवणारी साखळी खंडीत झाली. त्यामुळे राज्यावर विजेचे संकट आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या