JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / महाशिवरात्रीला त्रैलोकीचा राजा सुना सुना! जेजुरी गडावर शुकशुकाट पाहा PHOTO

महाशिवरात्रीला त्रैलोकीचा राजा सुना सुना! जेजुरी गडावर शुकशुकाट पाहा PHOTO

Jejuri Mahashivratri during Coronavirus: कोरोनाचा विळखा वाढल्यानं शासकीय आदेशानुसार जेजुरीवर जमावबंदी होती. पहाटे खंडेरायाची साग्रसंगीत पूजा झाली. आता ऑनलाइनच घ्या खंडेरायाचं दर्शन

0108

महाशिवरात्रीसारख्या दिवशीही खंडेरायाच्या जेजुरी गडावर अगदी सामसूम दिसून आली. कोरोनाचा विळखा वाढल्यानं शासकीय आदेशानुसार जेजुरी गडावर भाविकांविना महाशिवरात्री साजरी करण्यात आली.

जाहिरात
0208

महाशिवरात्री निमित्ताने आज आकर्षक अशा विविध रंगांच्या फुलांनी सजवून खंडोबाची पूजा बांधण्यात आली होती. खंडोबाची प्रतिमा अतिशय आकर्षक भासत होती.

जाहिरात
0308

गेली वर्षभर जगभरात कोरोनाची महामारी सुरु आहे. अजूनही कोरोनचा धोका तसाच आहे, त्यामुळे शासनाकडून सार्वजनिक सणासुदीवर बंदी घालण्यात आली आहे. आणि म्हणूनच जेजुरी गडावर हा शुकशुकाट दिसून येत आहे.

जाहिरात
0408

जेजुरी गडावरील नित्य वारकरी, पुजाऱ्यांनी गडावरील शिवलिंगांची महापूजा, अभिषेक आणि आरती करून महाशिवरात्रीचा सण साजरा केला.

जाहिरात
0508

पहाटे अडीच वाजता जेजुरी गडावरील मुख्य गाभारा, गाभाऱ्यातील उजवीकडील तळघरातील गुप्तलिंग, आणि शिखारातील शिखरलिंग उघडण्यात आलं होतं.

जाहिरात
0608

शिखर लिंग , घाभाऱ्यातील लिंग आणि तळघरातील गुप्त लिंग यांना अनुक्रमे स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळलोक येथील शिवलिंगांचे दर्शन घडतं असं मानलं जातं.

जाहिरात
0708

कोरोनामुळे खबरदारी म्हणून शासनाने ह्या सर्व उत्सवांवर बंदी आणली असल्याने. तीन दिवस जेजुरी गडावर जमावबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे कोणत्याच भाविकांना आज याठिकाणी प्रवेश देण्यात आला नाही.

जाहिरात
0808

त्यामुळे आज महाशिवरात्री असून देखील त्रैलोकींचा राजा भाविकांविना सुना सुना दिसून आला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या