JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / महाड इमारत दुर्घटना प्रकरण, 12 तासांनंतरही कसं सुरू आहे बचावकार्य पाहा PHOTOS

महाड इमारत दुर्घटना प्रकरण, 12 तासांनंतरही कसं सुरू आहे बचावकार्य पाहा PHOTOS

सध्या NDRF आणि पोलिसांकडून मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे

019

रायगड जिल्ह्यातील महाड परिसरात 5 मजली इमारत सोमवारी संध्याकाळी कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.

जाहिरात
029

तब्बल 12 तास उलटूनही ढिगारा हटवण्याचं काम पोलीस आणि NDRFकडून सुरू आहे. पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

जाहिरात
039

या दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी आहेत. तर इमारत कोसळताना 60 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

जाहिरात
049

6 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही 16 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून सध्या युद्धपातळीवर त्यांना शोधण्याचं कार्य सुरू आहे.

जाहिरात
059

महाड दुर्घटनेप्रकरणी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तात्काळ मदतीचे आदेश दिले असून या प्रकरणाची चौकशी देखील कऱण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

जाहिरात
069

पावसामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. मात्र सोमवारी संध्याकाळपासून सलग हे कार्य सुरू आहे.

जाहिरात
079

या 5 मजली इमरतीमध्ये एकूण 43 कुटुंब राहात होते त्यापैकी काही जण लॉकडाऊन आणि कोरोनामुळे गावीच अडकले होते.

जाहिरात
089

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तारिक गार्डन इमारतीचे बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

जाहिरात
099

सध्या NDRF आणि पोलिसांकडून मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या