06 जून : शेतकऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस असून बाजार समितीत आवक घटल्याने भाज्यांचे दर कडाडले आहे. 1 जूनपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य काही मागण्यांसाठी संप पुकारला आहे. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान बाजारात भाजीपाला आणि फळांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर कडाडले आहेत. याची झळ सहाजिकच सर्वसामन्यांना जणवत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर या तोडगा काडण्याची मागणी होत आहे. मुंबईच्या भायखळा मार्केटमध्ये भाजी बाजारात भाजीपाल्यांचे दर सुमारे 40 गाड्यांची आवक झाली आहे. पण माल नेहमीपेक्षा 30 ते 40 टक्के कमी आला आहे. सिन्नर, मंचर, जुन्नर, नाशिक किंवा नगर भागातील शेतीमाल आलेला नाही, तरी बाजारभाव सरासरी व्यवस्थित आहे. पाऊस पडल्यामुळे देखील शेतमालाची प्रत कमी झाली आहे. मुंबईतले आजचे भाजी दर- (प्रति किलो- घाऊक) टोमॅटो 25 रूपये भेंडी 36 ते 40 रु फ्लॉवर 40 ते 50 रु कारले 60 रु दोडका 100 रु वाटाणा 70 ते 100 रु. ढोबळी मिरची 50 ते 80 रु काकडी- 30 ते 40 रु कोबी -30 ते 40 रु कोथिंबीर (बारीक) 50 ते 100 रु तोंडली 40 ते 60 रु कांदा 14 ते 20 रु. बटाटा 14 ते 20 रु शेवगा शेंग 40 ते 60 रु जुडी वांगी 40 ते 80 रु. दुधी 50 ते 80रु चवळी 50 ते 60 रु बीन्स 80 ते 100 रु मेथी 40 रु जुडी हिरवी मिरची 60 ते 80रु मुळा 60 रु. पुदीना 20 रु. पुणे मार्केटयार्डात आज 657 भाजीपाला आणि फळगाड्यांची आवक झाली आहे. यातील भाजीपाल्याच्या 352 गाड्या आल्या आहेत. म्हणजेच एकूण 60 % आवक झालेत. भाज्यांचे दर मात्र आजही चढेच आहेत. याचा फटका सामान्य ग्राहकाला बसतोय. शहरात भाजीपाला तुटवडा आहे. पुण्यातले भाजी दर (किरकोळ) - (प्रति किलो) फ्लॉवर- 80 रु. कोबी 80रु. भेंडी 80 रु. टोमॅटो 40 रु. ढोबळी मिरची 80 रु. वांगी- 80 रु. चवळी शेंगा -70 रु. गवार- 70 रु. पालक- 20 रु. जुडी मेथी - 30 रु. जुडी