JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लातूर वैद्यकीय विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न; मैत्रिणींनी असं वाचवलं..

लातूर वैद्यकीय विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न; मैत्रिणींनी असं वाचवलं..

लातूर येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या चोवीस वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. (medical student suicide attempt) वसतिगृहाच्या खोलीतच या विद्यार्थिनीने गळफास घेतला. (student suicide attempt in latur)

जाहिरात

18 वर्षीय प्रेमी युगलांनी (girlfriend and boyfriend suicide) एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या साकोली तालुक्यात घडली

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लातूर, 7 एप्रिल : येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या चोवीस वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. (medical student suicide attempt)  वसतिगृहाच्या खोलीतच या विद्यार्थिनीने गळफास घेतला. (student suicide attempt in latur) मात्र, प्रसंगावधान राखून मैत्रिणीने आरडाओरड केल्यामुळे या गळफास घेणाऱ्या विद्यार्थिनीचा जीव वाचला आहे. काय आहे घटना - लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या खोलीतच गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी तिच्या मैत्रिणीने वेळीच आरडाओरड केल्याने कर्मचारी धावले. तसेच दरवाजा तोडून त्या विद्यार्थिनीच्या गळ्यातील गळफास काढला. ही विद्यार्थिनी मूळ कर्नाटकातील औराद बऱ्हाळी तालुक्यातील आहे. ही तरुणी लातुरातील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेते आहे. तसेच ती वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात अन्य दोन मैत्रिणींसोबत राहते. हे ही वाचा- Rohit Pawar on Sanjay Raut : राजकीय नेत्यांनी शब्द जपून वापरावेत; रोहित पवारांचा संजय राऊतांना सल्ला दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अभ्यासाचा ताणतणाव तिच्यावर जाणवत होता. त्यामुळेच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचा अंदाज आहे. या घटनेनंतर बेशुद्ध असलेल्या त्या विद्यार्थिनीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर याबाबतीत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या