JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING: साताऱ्यातील वाई आणि पाटणमध्ये घरांवर दरड कोसळली, 7 ते 8 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

BREAKING: साताऱ्यातील वाई आणि पाटणमध्ये घरांवर दरड कोसळली, 7 ते 8 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Landslide in Satatra District: सातारा जिल्ह्यातील वाई आणि पाटण तालुक्यात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा, 23 जुलै : मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) सातारा जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना (landslide in Satara district) घडल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील वाई (Vai) आणि पाटण (Patan) तालुक्यात दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. घरांवर दरड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची (NDRF team) टीम साताऱ्यात दाखल झाली आहे. पाटण तालुक्यातील मोरणा-गुरेघर भागातील आंबेघर गावामध्ये दरड कोसळली आहे. दरड दोन तीन घरांवर कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून ढिगाऱ्याखाली 7 ते 8 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. Ratnagiri Flood: चिपळूणमधील पुराची भीषणता दाखवणारे VIDEO आले समोर, दृश्य पाहून काळजाचा ठोका चुकेल तर वाई तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या कोंढावले जवळ देवरुखवाडी येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. यामुळे चार ते पाच घरे ढिगाऱ्याखाली गेली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. प्रशासन घटनास्थळी पोहचले असून काही लोकांचा संपर्क होत नसल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका रात्री करण्यात आलेली असून, अजून 2 महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आहेत. ढिगाऱ्याखालून सुटका केलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या