रत्नागिरी, 26 जुलै: कोकणातील (Kokan) महाभयंकर पूर (Flood) परिस्थितीतील हे दृश्य अंगावर शहारे आणणारी आहेत. या मुसळधार पावसात जगबुडी नदीला पूर आला आहे. या भीषण पूर परिस्थितीत महावितरणाच्या ठेकेदारांनी वाहत्या खाडी पात्रात इलेक्ट्रिकल लाईन दुरुस्त केली आहे. जगबुडी नदीच्या भीषण पूर परिस्थितीत तुटलेल्या तारांचं काम वाहत्या खाडी पात्रात पूर्ण केले. महावितरणाचे शासकीय ठेकेदार नयन इलेक्ट्रिकलच्या टीमनं आपला जीव धोक्यात टाकून खेडमधील खाडीपाट्यात रजवेल येथे 33 केव्हीची तुटलेली लाइन दुरुस्त केली आहे.
अंगावर शहारे आणणारे हे मदत कार्य असून काही तास या धोकादायक परिस्थितीत या टीमने 30 गावांचा खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत केला आहे.
जगबुडी नदीला आलेली महापुरामुळे खेडमधील खाडीपट्टा विभागात 30 गावांचा संपर्क तुटला होता. त्यात 33 केव्हीच्या विद्युत वाहिनीची तार तुटल्यानं वीज पुरवठा देखील खंडीत होता. मात्र अशा पूर परिस्थितीत महावितरणाचे शासकीय ठेकेदार नयन इलेक्ट्रिकल कंपनीच्या टीमने आपला जीव धोक्यात घालून वीजपुरवठा पूर्वत केला आहे. त्यांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.