JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांचं 'लाव रे तो व्हिडीओ', मॉलमध्ये मारहाण झालेला तरुण म्हणतो...

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांचं 'लाव रे तो व्हिडीओ', मॉलमध्ये मारहाण झालेला तरुण म्हणतो...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हर हर महादेव चित्रपटातील काही दृश्ये आणि संवादांना विरोध केला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हर हर महादेव चित्रपटातील काही दृश्ये आणि संवादांना विरोध केला होता. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी एकाला मारहाण केल्याचा आरोप करत ठाणे पोलिसांनी आव्हाडांना अटकही केली होती. या घटनेमुळे राज्यातील राजकारणात गोंधळ माजला होता. यानंतर हर हर महादेव चित्रपटाला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही चित्रपटात दाखवण्यात आलेल्या इतिहासावर तीव्र आक्षेप घेतला होता. यानंतर मनसेने या चित्रपटाचे समर्थन करत थेटर सुरू करण्याची जबाबदारी घेतली होती. यावरून मोठा गदारोळ झाला होता. या सगळ्यावर पडदा पडला असताना पुन्हा जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून मुद्दा उपस्थित केला आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

विवियना मॉलमध्ये झालेल्या गदारोळा नंतर माझ्यावर ३५४ चा कट रचण्यात आला होता पण तो फसला पण त्यात मनसे च्या कुठल्या ही नेत्याचा सहभाग नव्हता ज्यांनी मुंबऱ्याचा कट रचायला लावला तेच रचत होते विवियानाच्या तक्रारदरा वर दबाव टाकून कट ह्यात इतर कुठल्या ही पक्षाचा संबंध नाही.

संबंधित बातम्या

हे ही वाचा :  उदयनराजे यांचे अश्रू म्हणजे…; संजय राऊतांचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

जाहिरात

तक्रारदरानी स्वतः कबूल केले की जितेंद्र आव्हाडनी मला बाहेर काढले तर मग माझे नाव गुन्ह्यात आले कसे .. मनसे च्या ठाण्याच्या नेता जर पोलिस स्टेशन ला होता तर हे त्यानी थांबवायला हवे होते .. पण ३५४ च्या कटात तो नव्हता हे सत्य आहे .. ताई ला सगळे माहीत आहे. असेल ट्वीटमध्ये लिहत त्यांनी सोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे.

जाहिरात

नेमका काय आहे?

या महिन्यातील 7 नोव्हेंबर रोजी हर हर महादेव चित्रपटाचे शो बंद पाडण्यावरू ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो विवियाना मॉलमधील थिएटरमध्ये सुरू असताना रात्री 10 च्या सुमारास गदारोळ झाला. जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना मारहाण करून त्यांना बाहेर काढल्याचा आरोप मनसेनं केला.

जाहिरात

तर वाद घालणाऱ्या प्रेक्षकानं मद्यप्राशन केल्याचा दावा जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे शो सुरू असतानाच विवियाना मॉलमध्ये मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी खडाजंगी झाल्याचे पहायला मिळालं होत.

हे ही वाचा :  ईडीच्या याचिकेवर संजय राऊतांचे न्यायालयात शपथपत्र; भाजप, शिंदे गटावर गंभीर आरोप

विवियाना मॉलमध्ये झालेल्या या मारहाण प्रकरणाचे राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटत असताना ठाणे पोलिसांनी या मारहाण प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांना अटक केली होती. वर्तक नगर पोलीस स्टेशनला नोटीस देण्यासाठी म्हणून बोलवून नंतर अटक केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटद्वारे केला होता. तसेच, जे मी केलेलंच नाही, तो गुन्हा मी कबूल करणार नाही, असंही आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या