JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उदय सामंत यांना जाळून ठार मारू, नाना पटोलेंच्या समोरच रिफानरी विरोधकाची धमकी

उदय सामंत यांना जाळून ठार मारू, नाना पटोलेंच्या समोरच रिफानरी विरोधकाची धमकी

आम्ही आतंकवादी नाही, आम्ही सुद्धा मुंबईला असतो. कायदा नावाची काही गोष्ट आहे की नाही.

जाहिरात

आम्ही आतंकवादी नाही, आम्ही सुद्धा मुंबईला असतो. कायदा नावाची काही गोष्ट आहे की नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राजापूर, 12 सप्टेंबर : मुंबईतील दादरमध्ये शिवसैनिक आणि शिंदे गटामध्ये राडा झाला होता. हे प्रकरण ताजे असताना आता कोकणामध्ये वाद पेटण्याची चिन्ह आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्या राजापूर दौऱ्याच्या वेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कार्यकर्त्याने थेट शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (uday samant) यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिली. नाना पटोले हे  कोकणाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी रिफायनरी विरोधक जोशी नावाच्या कार्यकर्त्याने नाना पटोले आणि स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिली आहे. या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी आता या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी देखील लक्ष घातले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी उदय सामंत यांच्यासोबत चर्चा केली असून आता याबाबत अधिक चौकशी केली जात आहे. उदय सामंत यांना काय दिली धमकी? आम्ही आतंकवादी नाही, आम्ही सुद्धा मुंबईला असतो. कायदा नावाची काही गोष्ट आहे की नाही. कोणीही कंपन्या उघडून टाकतो. कुठला तरी मंत्री सांगतोय, त्या उदय सामंतला जाळून टाकू आम्ही. काय माहिती देताय ते, २९०० एकरची मालकी आहे, मालकी बिलकी गेली खड्यात. आमच्या जागा, आमचे गाव आहे. उद्या आम्ही काही खपवून घेणार नाही. आमची जागा आम्हाला पाहिजे, पंचक्रोशी आम्हाला पाहिजे, जर कुणी आमच्या पंचक्रोशीत पाय ठेवला तर त्याचा पाय तोडून हातात देऊ. या आंदोलनावर जर गोळीबार झाला तर याची पहिली गोळी, हा अप्पा जोशी घेईल, असंही हा कार्यकर्ता म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या