JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / EXCLUSIVE : वीज आणि गडगडाट यांच्या तीव्रतेवरून कशी ओळखाल वादळी पावसाची तीव्रता? हवामान तज्ज्ञांनी सांगितला सुरक्षेचा उपाय पाहा VIDEO

EXCLUSIVE : वीज आणि गडगडाट यांच्या तीव्रतेवरून कशी ओळखाल वादळी पावसाची तीव्रता? हवामान तज्ज्ञांनी सांगितला सुरक्षेचा उपाय पाहा VIDEO

या पावसाला ढगफुटी म्हणायची का? याबाबत यूकेच्या रेडिंग यूनिव्हर्सिटीमधील हवामान शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी माहिती दिली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 सप्टेंबर : कोरोनामुळे दोन वर्ष गणेशोत्सव उत्साहात झाला नाही. मात्र, या वर्षी मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यात गणेशोत्सव पार पडला. आज लाडक्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. यातच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसालाही सुरुवात आहे. यूकेच्या रेडिंग यूनिव्हर्सिटीमधील हवामान शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी वीज आणि गडग़डाट यांच्या तीव्रतेवरुन वादळी पावसाची तीव्रता कशी ओळखावी, याबाबत माहिती दिली आहे. आत्ताच विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस का पडू लागलाय? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. हवामान खात्याने तब्बल 31 जिल्ह्यांना येलो अलर्ट आणि 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. मग या पावसाला ढगफुटी म्हणायची का? याबाबत हवामान शास्त्रज्ञांनी माहिती दिली. यूकेच्या रेडिंग यूनिव्हर्सिटीमधील हवामान शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी याबाबत न्यूज 18 लोकमतला एक्सक्लूसिव्ह माहिती दिली. ऐका ते काय म्हणताएत?

वीज पडून 2500 लोकांचा मृत्यू -  वीजेच्या घटना जगभरात सर्वच ठिकाणी होत असतात. यामध्ये मनुष्य पशु आणि वित्त हानी होत असते. भारतातसुद्धा वीज पडल्यामुळे मृत्युचे प्रमाण जास्त आहे. वीज पडण्यापूर्वी जेव्हा वातावरण निर्मिती होत असते अशा वेळी जर सुरक्षिततेच्या बाबींचे पालन केले तर अशा घटनांमुळे होणाऱ्या जीवित व वित्त हानीचे रक्षण करता येऊ शकते. एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी सुमारे 2500 व्यक्तींचा मृत्यू वीज पडल्यामुळे होत असतो. यलो अलर्ट - सतर्क रहा Yellow Alert हवामानानुसार, हा अलर्ट किंवा इशारा म्हणजे आपण आपल्या क्षेत्राबद्दल किंवा दिनचर्याबद्दल सतर्क असले पाहिजे. काही खबरदारी घ्यायची असते. पिवळा अलर्ट जारी करण्याचा उद्देश लोकांना सतर्क करणे हा आहे. यानुसार, तुम्‍हाला तात्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे. हेही वाचा -  आकाशातून मृत्यू कोसळला! जळगावात बापलेकाचा हृदयद्रावक शेवट ऑरेंज अलर्ट - तयार रहा Orange Alert जेव्हा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला तेव्हा याचा अर्थ असा होतो की हवामानाने आता अधिक खराब हवामानासाठी तयार रहावे अशी मागणी केली आहे. जेव्हा हवामान असे वळण घेते, ज्याचा परिणाम जनजीवनावर होऊ शकतो, तेव्हा हा अलर्ट जारी केला जातो. खराब हवामानामुळे तुम्ही तुमच्या प्रवासासाठी, कामासाठी किंवा शाळेतील मुलांच्या प्रवासासाठी तयार राहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या