JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: बदलापुरात मुसळधार पाऊस; उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली, सोसायट्यांमध्ये गुडघाभर पाणी

VIDEO: बदलापुरात मुसळधार पाऊस; उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली, सोसायट्यांमध्ये गुडघाभर पाणी

Heavy rain in Badlapur, Ulhasnagar: मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पहायला मिळत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उल्हासनगर, 22 जुलै : मुंबई, ठाणे (Thane), कल्याण (Kalyan), बदलापूर (Badlapur), उल्हासनगर (Ulhasnagar) या सर्वच भागांत काल दुपारपासून मुसळधार पाऊस (Heavy rainfall) पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे आता उल्हास नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली (Ulhas River cross danger level) आहे. याचा परिणाम म्हणजे नदी पात्राच्या परिसरात असलेल्या सर्व परिसरात पाणीच पाणी झाले असून सोसायट्या सुद्या पाण्याखाली गेल्या आहेत.

बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीजवळील अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. गणेश नगर, चर्च, मानव पार्क रमेश वाडी आणि आजूबाजूचा परिसर परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे.

मध्यरात्रीच घरांमध्ये पाणी शिरले, त्यानंतर अनेकांनी आपली घरं सोडत दुसरीकडे आसरा घेतलाय. मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर सुद्धा झाला आहे. कर्जत ते अंबरनाथ लोकल सेवा वाहतूक ठप्प झाली असून टिटवाळा ते सीएसएमटी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

संबंधित बातम्या

टिटवाळा पूर्व रेल्वे स्थानका बाहेरील सखल भागतील चाळीत रहाणारे 500 हून अधिक घरे पाण्याखाली गेली होती. त्यात वीज पुरवठा सुद्धा खंडित झाल्यामुळे अनेक समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागला. बचाव कार्य अंधारात सुरू होते. पाण्याच्या प्रवाहामुळे मदतकार्यातही अनेक अडचणी येत होत्या. पहाटेच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतल्याने आता कुठे नागरिकांना थोडा दिलासा मिळत आहे. नाशिकमध्येही मुसळधार पाऊस

जाहिरात

नाशिकमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे सराफ बाजार, दहीपूल परिसरातील अनेक दुकानांत पावसाचं पाणी शिरलं. सोने, कपडे व्यावसायिकांच्या दुकानांत पावसाचं पाणी शिरल्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. नाल्यातून पाणी रस्त्यावर आले आणि अक्षरश: नदी प्रमाणे पाणी वाहत असल्याचं दिसून आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या