पुणे, 28 मे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची रुग्णांची संख्या 6879 झाली असली तरी 3661 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिली. अॅक्टीव्ह रुग्णसंख्या 2912 असून पुणे जिल्हयात एकूण 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 180 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली असल्याचेही त्यांनी सांगितले. विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8521 झाली आहे. विभागात