जगाची रुग्ण बरे होण्याची सरासरी 61.20 टक्के एवढी आहे. त्या सरासरीपेक्षा भारताचं प्रमाण जास्त आहे.
बारामती, 17 मे : कोरोना व्हायरसने जगात हाहाकार उडवला आहे. या व्हायरसशी दोन हात करताना रुग्णांवर उपचार करणे मोठे जिकरीचे झाले होते. अशातच ग्रामीण भागात आढळणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी पुणे शहरात घेऊन जावं लागत असल्याने रुग्णसंख्या वाढण्याचा धोकाही बळावत होता. यावर उपाय म्हणून उपमुखमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील तालुका पातळीवरील कोरोना रुग्ण तपासणीची पहिली प्रयोगशाळा आणि ICU सेवा देणारं हॉस्पिटल बारामतीमध्ये तयार झालं आहे. बारामतीच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रयोग शाळा आणि रुई ग्रामीण रुग्णालयात 8 बेड ICU आणि 16 जनरल बेड उपलब्ध झाले आहेत. प्रयोगशाळा-रुग्णालयाची सर्व कामे पूर्ण झाली असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची तपासणी आणि उपचार हे आता बारामतीतच होणार आहेत. बारामतीमध्ये गोरगरीब रुग्णांना महागडे उपचार परवडत नाहीत. ICU सारखी उपचार सेवा सरकारी दवाखान्यात उपलब्ध झाल्यामुळे गोरगरीब नागरिकांना याचा फायदा होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर जळगाव, नांदेड, कोल्हापूरसह बारामतीमध्ये प्रयोगशाळा व कोव्हिड 19 साठी हॉस्पिटल उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र टेंडर काढणे, मंजुरी येणे अशा शासकीय निधीला वेळ लागणार आहे. ही गोष्ट लक्षात येताचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक उद्योजकांना देणगीद्वारे मदत करण्याचे आवाहन करताच अनेक उद्योजकांनी लाखो रुपयांची मदत केली. स्थानिक खासगी डॉक्टर यांचा नियोजनात मोठा वाटा राहिला.प्रयोगशाळा आणि ICU बेडचे व्यावस्थापन करण्यासाठी ऐनवेळी अनुभवी लोकांची कमतरता पडू लागतातच बारामती मधील डॉ. तांबे, सदानंद काळे, मनोज खोमणे या शासकीय डॉक्टर यांच्यासह खासगी सेवा देणारे हर्षवर्धन व्होरा, शशांक झळक,डॉ. मदने, व इतर डॉक्टर काम करत आहेत. संपादन - अक्षय शितोळे