JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कृषीपंपाच्या वीजदरात अडीच पटीनं वाढ, 40 लाख शेतकऱ्यांना फटका

कृषीपंपाच्या वीजदरात अडीच पटीनं वाढ, 40 लाख शेतकऱ्यांना फटका

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा हा निर्णय आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

20 एप्रिल :  राज्य सरकारने कृषीपंपाच्या वीजदरात अडीच पटीनं वाढ केल्याने शेतकऱ्यांवर आणखी एक बोजा पडला आहे. याचा 40 लाख शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या भावाचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नसताना कर्जाखाली अगोदरच दबून गेलेला आहे. हे कमी म्हणून की काय, आता तर महावितरणनं चक्क शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या वीजदरात चक्क अडीच पटीनं वाढ केली आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा हा निर्णय आहे. या दरवाढीचा फटका जवळपास 40 लाख शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकऱ्यांवर आधीच कर्जाचा बोजा आहे. यामध्ये सरकारने सवलतीच्या दरांबाबत आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या