सध्या जगात नव्या जमान्याचे रोजगार निर्माण होत आहेत पण भारतीय तरुणांनी पदवी तसेच पारंपारीक शिक्षण घेण्याकडेच जास्त ओढा आहे. एकूण 180 अब्ज डॉलरच्या इतक्या मोठ्या डोमेस्टिक सॉफ्टवेअर उद्योगात फक्त 40 लाख लोकांनाच रोजगार मिळाला आहे.
मुंबई, 5 मार्च : आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालातून एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 2019-20 या वर्षांत दीड लाख रोजगार कमी झाले आहेत. आज विधानसभेत राज्याचा आर्थिक पाहणी अहवाद सादर करण्यात आला. 2018-19 या वर्षी राज्यात 73 लाख 50 हजार रोजगार उपलब्ध होते, तर 2019-20 या वर्षी राज्यातील रोजगारात घट होऊन तो 72 लाख 3 हजारांवर आला आहे. म्हणजेच राज्यातील रोजगारात 1 लाख 47 हजारांची घट झाली आहे. याशिवाय राज्याचा बेरोजगारीचा दर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याचा बेरोजगारी दर 8.3 टक्के असून कर्नाटकचा 4.3 टक्के, गुजरातचा 4.1 टक्के, पश्चिम बंगालचा 7.4 टक्के आणि पंजाबचा 7.6 टक्के इतका असून या आकड़ेवारीवरुन महाराष्ट्राचा बेरोजगारीचा दर सर्वात जास्त असल्याचे समोर आले आहे. हे वाचा - दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र 5 व्या स्थानावर, मंदीमुळे विकासदर 5.7 टक्क्यांवर आर्थिक पाहणी अहवालात नमूद केल्यानुसार राज्यात महिला अत्याचारात झाली वाढ आहे. वर्ष 2018 मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या 35,497 घटना घडल्या होत्या. तर 2019 मध्ये हे प्रमाण वाढून 37,567 पर्यंत पोहोचले आहे. वर्ष 2018 मध्ये बलात्काराचे 4974 गुन्हे नोंदविण्यात आले होते त्यात वाढ होऊन 2019 मध्ये 5412 पर्यंत पोहोचले आहे. महिलांचे अपहरण आणि पळवून नेणे यात लक्षणीय वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. 2018 मध्ये 6825 गुन्ह्यांची नोंद झाली होती ती वाढून 2019 मध्ये 8382 इतकी झाली आहे. यामध्ये हुंडाबळीचं प्रमाण मात्र कमी झालं. 2018 मध्ये 200 आणि 2019 मध्ये 187 घटना नोंदविण्यात आल्या आहेत