JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Disha Salian Death Case: दिशा सालियानच्या कुटुंबीयांचे राष्ट्रपतींना पत्र, राणे पिता-पुत्रांवर कारवाईची मागणी

Disha Salian Death Case: दिशा सालियानच्या कुटुंबीयांचे राष्ट्रपतींना पत्र, राणे पिता-पुत्रांवर कारवाईची मागणी

आरोप-प्रत्यारोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण (Disha Salian death case) सातत्यानं चर्चेत आहे. आता या अनुषंगानं एक नवीन माहिती समोर आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 मार्च: आरोप-प्रत्यारोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण (Disha Salian death case) सातत्यानं चर्चेत आहे. आता या अनुषंगानं एक नवीन माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती दिवंगत दिशा सालियानच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ‘आमच्या मुलीच्या मृत्यूचं राजकारण केलं जात आहे’,  असा आरोप देखील दिशाच्या पालकांनी या पत्रात केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या

28 वर्षाच्या दिशा सालियानने 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केली होती. दिशा बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याची आधीची मॅनेजर होती. दिशाच्या मृत्यूनंतर 6 दिवसांनी सुशांत सिंग राजपूत बांद्रा येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. दिशाच्या मृत्युमुळे एकीकडे तिचे आई-वडील दुःखात असताना, दुसरीकडे या घटनेचा सुशांत सिंगलाही धक्का बसला होता. मात्र काही दिवसांनंतर त्याच्याही मृत्यूची बातमी आली. त्यानंतर या प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात आली आणि नंतर यात ड्रग्जचा अँगलही समोर आला होता. हे वाचा- ‘ज्याप्रमाणे ओबामांनी ओसामाला मारलं तसं दाऊदला घरात घुसून मारा, दाखवा मर्दपणा’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वास्तविक, दिशा सालियान हिच्या मृत्यूबाबत राणे पिता-पुत्रांनी काही वक्तव्ये केली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे दिशा सालियानप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याला विरोध करत मुंबई पोलिसांनी चौकशीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल त्यांनी खोटं वक्तव्य केल्याचं न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयाने नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांना दिलेला अंतरिम दिलासा 15 मार्चपर्यंत वाढवला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवले होते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यूबाबत खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी आपल्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा त्यांनी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केला होता. मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी 19 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली. राणे पिता-पुत्र पहिल्यापासून असा दावा करत आहेत की दिशावर सामूहिक बलात्कार झाला होता त्यामुळे तिने आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा एका राजकीय कुटुंबातील सदस्य उपस्थित होता, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केंद्रीय संस्थांनी करावी. त्यानंतर त्यांच्याविरूद्ध कथित मानहानीच्या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला. दिशा सालियानच्या आईने त्यांच्याविरोधात ही तक्रार केली होती. हे वाचा- “सुशांतसिंहच्या घरी काहीजण गेले, मंत्र्याची गाडी होती, बाचाबाची झाली आणि….” नारायण राणेंचा खळबळजनक दावा दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. मात्र दिशाच्या आई-वडिलांनी याचा इन्कार केला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नीतेश यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दिशाच्या पालकांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या