JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / केंद्राच्या मदतीशिवाय राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले का? विखे पाटलांचा ठाकरे सरकारला थेट सवाल

केंद्राच्या मदतीशिवाय राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले का? विखे पाटलांचा ठाकरे सरकारला थेट सवाल

Corona vaccination: राज्यात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्य सरकार केंद्र सरकारवर दुजाभावाचा आरोप करत असातना आता भाजपने त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिर्डी, 30 एप्रिल: महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध भागांत कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा (Covid vaccine shortage) जाणवत असल्याने लसीकरण ठप्प झाले आहे. यावरुन राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून केंद्रावर दुजाभावाचा आरोप करण्यात येत आहे. आता या आरोपांना भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लसीकरणात पंतप्रधानांनी भेदभाव केल्याचा आरोप करणारे महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण (Highest vaccination in Maharashtra) झाल्याने स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत याचे आश्चर्य वाटतेय. आपण काय बोलतोय याचं भान आघाडीतील मंत्र्यांनी ठेवायला हवं असं भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. राधाकृष्ण विखे पाटलांचा थेट सवाल लसीकरणासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेतला आहे आणि राज्य सरकार, केंद्र सरकारचा लसीकरणात दुजाभाव करत असल्याचा आरोप करत आहे. दुसरीकडे देशात सर्वात जास्त लसीकरण महाराष्ट्रात झाल्याने सरकार पाठ थोपटून घेत आहे. मग केंद्राच्या मदतीशिवाय लसीकरण झाले का? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. Covid Vaccination: महाराष्ट्र दिनी 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होण्याचे संकेत लॉकडाऊनपूर्वी केलेल्या घोषणांचे काय? महाराष्ट्राने 1 मे पासून मोफत लसीकरणाचा पुढाकार घेतलाय या निर्णचे स्वागतच आहे. आता राज्य सरकारने लॉकडाऊन आणखी वाढवलाय. मात्र लॉकडाऊनच्या अगोदर केलेल्या घोषणांचे काय? किती अंमलबजावणी झालीय? अजून लोकांची उपासमार सुरू आहे. किमान आपण केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होते की नाही हे मुख्यमंत्र्यांनी बघावं असंही राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनासाठी सुविधा द्या यासाठी मंत्री पत्र लिहतात हे आश्चर्य आहे. मंत्र्यांचे काम होतं सुविधा करण्याच, कोरोनाचे आज सुरू झालेले संकट नाहीये. एक वर्षानंतर मंत्र्यांना जिल्ह्यात सुविधांचा अभाव असल्याचं कळलंय. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणे हा फक्त फार्स असून आपली अब्रू आणि अपयश झाकम्याचा हा प्रकार असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केलीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या