JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Cyrus Mistry Accident : सायरस मिस्त्रींच्या अपघातावेळी काय झालं? मर्सिडिजच्या चिपचा रिपोर्ट समोर

Cyrus Mistry Accident : सायरस मिस्त्रींच्या अपघातावेळी काय झालं? मर्सिडिजच्या चिपचा रिपोर्ट समोर

सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा (Cyrus Mistry Car Accident) तपास करताना मर्सिडिज कंपनीने गाडीचा डेटा तपासण्यासाठी नेला होता, त्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.

जाहिरात

Cyrus Mistry accident

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 सप्टेंबर : टाटा समुहाचे (Tata Group) माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry Car Accident) यांचा रविवारी रस्ते अपघातात (Cyrus Mistry Road Accident) मृत्यू झाला. मर्सिडीज बेन्झ GLC 220 या त्यांच्या कारचा अहमदाबाद-मुंबई हायवेरवर डिव्हायडरला लागून अपघात झाला. या प्रकरणी आता मोठी माहिती समोर येत आहे. सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा तपास करताना मर्सिडिज कंपनीने गाडीचा डेटा तपासण्यासाठी नेला होता, त्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडिज गाडीचा वेग हा 100 किमी प्रती तास होता. ज्यावेळी मर्सिडिज डिव्हायडरला धडकली तेव्हा गाडीचा वेग 89 किमी प्रती तास एवढा झाला. अपघातावेळी गाडीचा वेग फक्त 11 किमी प्रती तास एवढा कमी झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात नेमका कसा झाला? अपघातावेळी कारचा स्पीड किती होता? कारमधल्या कोणकोणत्या एअर बॅग्स सुरू होत्या? कारचे ब्रेक आणि दुसरी मशीन काम करत होती का नव्हती? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सायरस मिस्त्रींच्या कारचं ECM म्हणजेच Engine Control Module काढून जर्मनीला पाठवलं आहे. ही चिप डिकोड केल्यानंतर SUV बाबत पूर्ण माहिती मिळेल. ही माहिती कंपनी पोलिसांना देईल. मर्सिडीजच्या या गाडीला ग्लोबल NCAP टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आलं आहे. तसंच कंपनीने त्यांच्या सगळ्या कार योग्य टेस्टिंगनंतरच प्लांटमधून बाहेर काढल्या जातात, असा दावा केला आहे. त्यामुळे पोलिसांनी कंपनीला प्लांटमधून गाडी बाहेर येण्याच्या आधीचा रिपोर्ट काय आहे? कारमध्ये कोणता मेकॅनिकल फॉल्ट होता का? असेही प्रश्न विचारले आहेत. मिस्त्रींच्या कारने चरोटी चेक पोस्ट रविवारी दुपारी 2 वाजून 21 मिनिटांनी क्रॉस केलं होतं. यानंतर 20 किमी दूर त्यांच्या गाडीचा अपघात झाला, हे अंतर फक्त 9 मिनिटांमध्ये पार करण्यात आलं. सायरस मिस्त्री रविवारी दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी उदवाडाहून निघाले होते आणि अपघात दुपारी 2.30 वाजता झाला. त्यांनी 60-65 किमीचं अंतर 1 तास 4 मिनिटांमध्ये पार केलं. प्रवास करताना ते कुठे थांबले होते का? मध्येच त्यांनी गाडीचा स्पीड वाढवला का? याचाही तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या