JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बेळगाववमध्ये चिंता वाढली, आणखी 4 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

बेळगाववमध्ये चिंता वाढली, आणखी 4 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

दिल्लीतील निजामुद्दीनला गेलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना लागण.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बेळगाव, 12 एप्रिल: बेळगावमध्येही कोरोनाचा धोका वाढत असल्याचं दिसून येत आहे. आज पुन्हा शहरातील 4 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. बेळगावमध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 14 झाला आहे. हे चारही रुग्ण रायबाग कुडची परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे. त्यातील एक जण दिल्लीमध्ये पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजर राहिला होता. त्याच्या कुटुंबीयांना ही लागण झाल्याची माहिती मिळत आहे. हा रुग्ण आणखीन कोणाकोणाला भेटला यासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे. महाराष्ट्रात वाढला धोका… महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 134 रुग्णांची संख्या वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 113 रुग्ण हे मुंबईतच आढळले आहे. महाराष्ट्राला कोरोना व्हायरसने घातलेला विळखा वाढतच चालला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्याही 1895 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात मुंबई, पुणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. हे वाचा- नवजात बाळाला हवे होते कपडे, आदित्य ठाकरेंनी बाळांतीण महिलेची अशी केली मदत देशभरात 24 तासांत 909 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण भारतात कोरोना व्हायरस एप्रिल महिन्यात वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार 24 तासांत 909 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. तर अद्यापही 2 हजार नागरिकांचे रिपोर्ट्स येणं बाकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे 24 तासांत कोरोनामुळे 34 तर आतापर्यंत 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात रुग्णांची संख्या 8,356 वर पोहोचली आहे. त्यापैकी 7,367 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 716 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामध्ये सर्वात लहान 6 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. संपादन- क्रांती कानेटकर हे वाचा- जवानाच्या पार्थिवासोबत पत्नी आणि मुलगा, 10 तासाच्या प्रवासाची वेदनादायी कहाणी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या