JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूरसाठी कोरोनाबाबत आजपर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी

कोल्हापूरसाठी कोरोनाबाबत आजपर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी

सुरुवातीच्या टप्प्यात या धोकादायक व्हायरसला दूर ठेवण्यात यशस्वी झालेल्या कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी कोरोनाचा शिरकाव झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 26 मे : कोरोनाची महाराष्ट्रात एण्ट्री झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात या धोकादायक व्हायरसला दूर ठेवण्यात यशस्वी झालेल्या कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत होती. मात्र आज कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची आणि सुखद धक्का देणारी माहिती समोर आली. आज दिवसभरात जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध तालुक्यांत आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज एकही रुग्न न आढळल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 1300 जणांचे अहवाल निगेटिव्ह मात्र हा दिलासा मिळत असतानाच कोल्हापूरकरांना अलर्ट करणारी एक बातमीही आली आहे. येत्या 6 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात 9 हजार चाकरमानी परतणार आहेत. रेडझोनसह इतर जिल्हे आणि राज्यांमधून येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.31 मे पर्यंत 9 हजार कोल्हापूरकरांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे. केंद्र सरकारच्या मानक प्रणालीनुसार प्रवाशांना परवाने दिले जातील. हेही वाचा- चाचणी न घेता 9 जणांचे रिपोर्ट कोरोना प़ॉझिटिव्ह; प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे ठप्प झालेली कोल्हापूरची विमानसेवा कालपासून सुरू करण्यात आली आहे. तब्बल दोन महिन्यानंतर कोल्हापूर विमानतळावर विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग झालं आहे. हैद्राबादहून अलायन्स एअरचं पाहिलं विमान कोल्हापूर विमानतळावर पोहचलं. या विमानाने 19 प्रवाशी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. या सर्वांना आता शासकीय नियमानुसार क्वारन्टाइन करण्यात आलं आहे. तर याच वेळी कोल्हापूरहून हैद्राबादसाठी जाणाऱ्या एका प्रवाशाचं तापमान अधिक असल्याने त्याला विमान प्रवास नाकारण्यात आला. दुसरीकडे, कोल्हापूर मध्ये दोन महिन्यानंतर रिक्षा वाहतूक सुरू झाली खरी, पण रिक्षा स्टॉपवर जरी रिक्षा दिसत असल्या तरी त्यात बसायला पॅसेंजरच उपलब्ध नाहीत, अशी स्थिती पाहायला मिळाली. संपादन - अक्षय शितोळे कोरोना लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं

News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
टॉप व्हिडीओज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या