JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोरोनाच्या संकटात चुकीचे मेसेज पाठवणं पडलं महागात; 14 जणांना अटक, 3 वर्षांची शिक्षा

कोरोनाच्या संकटात चुकीचे मेसेज पाठवणं पडलं महागात; 14 जणांना अटक, 3 वर्षांची शिक्षा

बीड पोलिसांनी पाच दिवसांमध्ये 10 गुन्हे दाखल केले आहेत.

जाहिरात

व्हॉट्सअ‍ॅपच्या या वैशिष्ट्यासह वापरकर्ते यूआरएल लिंक किंवा क्यूआर कोड तयार करू शकतात. त्यामुळे, कोणालाही नंबर न विचारता किंवा नंबर सेव्ह न करता लिंक किंवा कोड वापरून त्यांच्याशी संपर्क साधू शकता.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 5 एप्रिल : एकीकडे महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचं संकट गोंगावत असताना सोशल मीडियावर अफवांना आणि चुकीच्या मेसेजेसना पेव फुटलं आहे. मात्र असे मेसेज पाठवणं बीडच्या काही तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. निजामुद्दीन येथील मरकस प्रकरणाचा आधार घेऊन नागरिक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हिंदू-मुस्लीम यांच्या भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बीड पोलिसांनी पाच दिवसांमध्ये 10 गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी 14 लोकांना अटक करून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 505 ( 2), 295 अ,153 अ याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये तीन वर्षाची शिक्षा असल्याचेही पोलीस अधिक्षक हर्ष पोतदार यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे जर अशा प्रकारच्या पोस्ट कुठल्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आढळून आल्या तर ती पोस्ट टाकणाऱ्या संबंधित व्यक्तीविरुद्ध आणि त्या ग्रुपच्या अॅडमिन विरोधातही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व ग्रुपच्या अ‍ॅडमिनने अ‍ॅडमिन सेटिंग करून आपल्या ग्रुपमध्ये येणाऱ्या पोस्टवर कंट्रोल करण्याची भूमिका घ्यावी असंही त्यांनी आवाहन केलं आहे. दरम्यान, कोरोनामुळे आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 635 वर पोहोचली आहेत. सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या मुंबई, पुण्यात आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. शुक्रवारी हा आकडा 490 इतका होता. गेल्या 24 तासात राज्यात 145 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तब्बल 52 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या