कोरोनावरचं Sputnik V हे औषध सुरक्षित असल्याचा दावा रशिया कायम करत आला आहे.
सांगली, 5 सप्टेंबर : प्रमुख महानगरांसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आाहे. अशातच सांगली जिल्ह्यातील दोन आमदार आणि एका माजी आमदाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. दुसरीकडे, राजकीय नेत्यांसोबतच प्रशासनातीलही बड्या अधिकाऱ्यांपर्यंत कोरोनाने धडक दिली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांना घरीच अलगीकरण करण्यात आले असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दिवंगत आर आर पाटील यांच्या कुटुंबातील इतर दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं कालच स्पष्ट झालं होतं. आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील आणि आर. आर पाटील यांचे बंधू सुरेश पाटील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात काय आहे स्थिती? - सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 612 कोरोना रुग्णाची भर - आज कोरोनामुळे 36 रुग्णाचा मृत्यू : जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 633 - सांगली महापालिका क्षेत्रात 228 रुग्ण आढळले - ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 6927 - जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 16262