JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नंदुरबारमध्ये 300 हून अधिक बेड रिकामी, तीन महिन्यातच जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; रुग्णांची संख्या शून्यावर

नंदुरबारमध्ये 300 हून अधिक बेड रिकामी, तीन महिन्यातच जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; रुग्णांची संख्या शून्यावर

corona Virus Nandurbar district: कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) बऱ्यापैकी राज्यात ओसरली आहे. राज्यातल्या जिल्ह्यांमध्येही काहीशी तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

जाहिरात

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार अशी भीती एकीकडे वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे, राज्य आता कोरोना रुग्ण बरे होण्याची...

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नंदुरबार, 12 ऑगस्ट: राज्यात (Maharashtra Corona Virus) कोरोनाचा (Corona Virus) प्रार्दुभाव कमी झालेला दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) बऱ्यापैकी राज्यात ओसरली आहे. राज्यातल्या जिल्ह्यांमध्येही काहीशी तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशातच नंदुरबार जिल्ह्यानं (Nandurbar district) कोरोनामुक्तीकडे वाटचाल केली आहे. जिल्ह्यात सध्या एकही अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) नसल्याची माहिती समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या 6 तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या आकड्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही शून्य झाली आहे. त्याहून दिलासादायक बाब म्हणजे शेवटच्या कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊन 50 दिवसांहून अधिक दिवस झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेला थोड्या फार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मार्च- एप्रिलमध्ये होती भयावह परिस्थिती मार्च एप्रिल महिन्यात नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन मिळत नव्हते. त्यामुळे कोरोना बाधितांचं प्रचंड हाल झाले होते. मात्र तीन महिन्यानंतर परिस्थिती सुधारली आहे. तीन महिन्यातच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या शून्यावर पोहोचली आहे. राज्यातल्या या खासदाराच्या मुलीचा बालहट्ट पंतप्रधानांनी केला पूर्ण गेल्या 15 दिवसात एकही नवा कोरोना रुग्ण आढळून आला नाही आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण उपचार घेत नाही आहे. त्यामुळे आता रुग्णालयातील साडे चारशेहून अधिक बेड रिकामी आहेत. धडगाव तालुक्यात एकही रुग्ण नाही नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यात गेल्या 40 दिवसांपासून एकही नवा कोरोना रुग्ण आढळलेला नाही. त्यानंतर शहादा, अक्कलकुवा, नवापूर आणि तळोदा, नंदुरबार सारख्या तालुक्यांमधील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही शून्यावर पोहोचली आहे. त्यातच कोरोनामुळे मृत्यू झालेल्याही 50 दिवसांपासून अधिकचा काल उलटला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या