JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्र अंधारात बुडणार? कोळशाच्या संकटामुळे वीज निर्मिती घटली, केंद्रीय मंत्री म्हणतात..

महाराष्ट्र अंधारात बुडणार? कोळशाच्या संकटामुळे वीज निर्मिती घटली, केंद्रीय मंत्री म्हणतात..

Coal shortage power crisis: महाराष्ट्रात 7 औष्णिक उर्जेवर आधारित वीज प्रकल्प आहेत. या प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी दररोज सुमारे 1.45 लाख मेट्रिक टन कोळशाची आवश्यकता असते. परंतु, शनिवारी केवळ 6.5 लाख मेट्रिक टन कोळसा शिल्लक होता. नाशिक आणि भुसावळ प्लांटमध्ये एक-दोन दिवसांचा कोळसा शिल्लक आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 एप्रिल : देशातील कोळसा संकटाचा (Coal Crisis) गंभीर परिणाम महाराष्ट्रातील 7 वीज प्रकल्पांवरही (electricity plant) झाला आहे. राज्यातील अनेक वीज केंद्रांमध्ये फक्त एक-दोन दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने होत नाही. मात्र, केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी कोळशाचा तुटवडा नसल्याचं सांगितलं आहे. महिनाभर पुरेल इतका कोळसा उपलब्ध असल्याचा त्यांचा दावा आहे. महाराष्ट्रात नाशिक, भुसावळ, बीड, चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा आणि पारस येथे 7 औष्णिक ऊर्जा आधारित ऊर्जा प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची वीज निर्मिती क्षमता 9540 मेगावॅट आहे. TOI च्या अहवालानुसार, सध्या ते केवळ 6900 मेगावॅट वीज निर्माण करण्यास सक्षम आहेत. कारण आहे कोळसा संकट. वीज निर्मिती अधिकार्‍यांनी वृत्तपत्राला सांगितले की या प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी दररोज सुमारे 1.45 लाख मेट्रिक टन कोळसा लागतो. मात्र, शनिवारी केवळ 6.5 लाख मेट्रिक टन कोळसा बॅकअपमध्ये होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नाशिक आणि भुसावळ प्लांटमध्ये फक्त एक-दोन दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक आहे, वास्तविक 7 दिवसांचा बॅकअप असावा. उर्वरीत वीज केंद्रात काही दिवसांचा साठा शिल्लक आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोळशाचे हे संकट असल्याचे त्यांचेही मत असले तरी सध्या उन्हामुळे विजेची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत कोळशाचा तुटवडा आहे. खाणीपासून दूर असलेल्या औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळसा संकट! अनेक भागांमध्ये लोडशेडींगची भिती महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले की, शनिवारी एकूण विजेची मागणी 24,551 मेगावॅट होती, तर केवळ 16,993 मेगावॅट वीज मिळाली. ते म्हणाले की, राज्यातील वीज प्रकल्पांमध्ये केवळ एक ते सात दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक आहे. कोळसा न मिळाल्यास उत्पादनावर परिणाम होईल. महाराष्ट्राला सर्वाधिक कोळसा पुरवठा चंद्रपूर आणि विदर्भातून होतो. वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी परदेशातून कोळसा आयात करण्याबाबत बोलले होते. यासोबतच छत्तीसगडमधून कोळसा आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली. सध्या देशातील बहुतांश वीज प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील 70 टक्के विजेची मागणी कोळशावर आधारित वीज प्रकल्पांद्वारे भागवली जाते. सध्या 100 हून अधिक औष्णिक ऊर्जा केंद्रांमधील कोळशाचा साठा 25 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. 50 प्लांटमध्ये फक्त 10 टक्के कोळसा शिल्लक आहे. मात्र, वीज प्रकल्पांसाठी पुरेसा कोळसा उपलब्ध असल्याचा दावा कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शनिवारी केला. आकडेवारी देताना ते म्हणाले की 72.50 दशलक्ष टन कोळसा विविध स्त्रोतांकडून उपलब्ध आहे, त्यापैकी 22 दशलक्ष टन औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये आहे. हे एका महिन्यासाठी पुरेसे आहे. दररोज विक्रमी कोळशाचे उत्पादन करून कोळशाची टंचाई भागवली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या