मराठी बातम्या /
महाराष्ट्र /
2010 ते 2021 कशी होती चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीची प्रक्रिया, वाचा सविस्तर मुद्दे
2010 ते 2021 कशी होती चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीची प्रक्रिया, वाचा सविस्तर मुद्दे
lifted liquor Ban in Chandrapur: अवैध दारुविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेत अससल्याचं सांगण्यात येतंय.
चंद्रपूर, 27 मे: राज्य सरकारनं चंद्रपूर (Chandrapur) मधील दारूबंदी उठवण्याचा निर्णय (Government lifted liquor Ban in Chandrapur) घेतला. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. चंद्रपूरमध्ये होत असलेली अवैध दारुविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेत अससल्याचं सांगण्यात येतंय. फडणवीस सरकारनं लावलेली दारुबंदी महाविकास आघाडी सरकारनं उठवल्यानं आता यावरून मोठ्या राजकाराणाला पुन्हा एकदा तोंड फुटणार आहे. दरम्यान जिल्ह्यात दारुबंदी कशी लागू झाली होती. हे सविस्तर जाणून घेऊया अशी लागू झाली होती चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी
2010 च्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या मागणी साठी आवाज उठू लागले होते.
एल्गार समितीच्या ऍड चारुलता गोस्वामी यांच्या नेतृत्वात जानेवारी 2012 मध्ये पहिली सभा झाली.
2012 पासून महिला मोर्च्यांना सुरुवात झाली.
तत्कालीन मुख्यमंत्री यांनी या विषयासाठी संजय देवतळे समिती गठीत करून अहवाल सादर करण्यास सांगितले.
फेब्रुवारी 2012 मध्ये संजय देवतळे समितीने आपला अहवाल सादर केला.
भाजपने दारूबंदीचे समर्थन करत सरकार आल्यास दारूबंदी करण्याची घोषणा केली.
588 ग्रामपंचायतने दारूबंदीचा ठराव पारित केला.
भाजप सरकारने 1 एप्रिल 2015 रोजी दारूबंदी लागू केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.