बुधवार 5 जुलै 2020 रोजी लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला असून 4 लाख ते 5 लाख चाचण्यांचा टप्पा अवघ्या 15 दिवसांमध्ये गाठण्यात आला आहे.
मुंबई, 21 एप्रिल : राज्याची राजधानी असलेली मुंबई आता कोरोनाची राजधानी होऊ लागली आहे. कारण राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले असून अजूनही ही संख्या वाढत चालली आहे. पत्रकार, पोलीस, डॉक्टर यांच्यापासून ते थेट भाजीवाला अशा अनेक स्तरातील व्यक्तींना या व्हायरसची लागण झाली आहे. अशातच भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेवर गंभीर आरोप करत एक वेगळीच भीती व्यक्त केली आहे. ‘काहीच बदललं नाही तर मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. खरे आकडे अजून सांगितले जात नाहीत. आता दाखवण्यात येणाऱ्या आकड्यांपासून खरे आकडे खूप जास्त आहेत. मुंबई महापालिकेत लवकरच नवे आयुक्त येणार? आरोप-प्रत्यारोपांमध्ये लोकांचा जीव जाईल. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आर्मीला बोलावणं, हा एकमेव पर्याय राहिला आहे,’ असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.
एकीकडे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत लोकांना दिलासा देत आहेत. मात्र त्याचवेळी नितेश राणे यांनी परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाची नेमकी परिस्थिती काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आकडे कोणतेही असो पुढील काही दिवस मुंबईसाठी महत्त्वाचे असून मुंबईकरांना संयम ठेवून काळजी ही घ्यावीच लागणार आहे.