पालघर, 04 सप्टेंबर: बोईसर (Boisar) तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील जखारिया कंपनीत (Jakharia Fabric Ltd) मोठा स्फोट (Explosion) झाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. वृत्तसंस्था ANI नं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. या स्फोटात चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या स्फोटाचा आवाज जवळपास तीन ते चार किमी पर्यंत आला असं म्हटलं जात आहे. मात्र हा स्फोट कशामुळे झाला त्याच कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. जखमी चौघांना स्टार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
बोईसर येथे असलेल्या जखारिया कंपनीत हा स्फोट झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.