JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ज्या दुचाकीला हात दिला, ती स्पीड ब्रेकरवरून उडाली, शिक्षिकेचा जागीच मृत्यू

ज्या दुचाकीला हात दिला, ती स्पीड ब्रेकरवरून उडाली, शिक्षिकेचा जागीच मृत्यू

सुषमा निकम या खेड तालुक्यातील मोहाने या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

जाहिरात

मृत शिक्षिका सुषमा जयवंत निकम

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रत्नागिरी, 24 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुडोशी येथे दुचाकीवरून पडून प्राथमिक शिक्षिकेचे अपघाती निधन झाले आहे. मोहाने येथून खेडच्या दिशेने दुचाकीवरून येत असताना स्पीड ब्रेकरवर दुचाकी आदळल्याने तोल जाऊन पडून एका शिक्षिकेचा मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कुडोशी गावानजीक घडली. काय आहे संपूर्ण बातमी - मिळालेल्या माहितीनुसार, सुषमा जयवंत निकम (वय 54 रा. भरणे बाईतवाडी, मुळगाव कुळवंडी, तालुका खेड) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. सुषमा निकम या खेड तालुक्यातील मोहाने या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. काल 23 जानेवारीला सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर त्यांनी एका दुचाकीला हात दाखवला. यानंतर त्या दुचाकीस्वराच्या पाठीमागे बसून त्या खेडच्या दिशेने येत होत्या. मात्र, कुडोशी गावानजीक असणाऱ्या स्पीड ब्रेकर वरून गाडी गेल्यानंतर त्यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावरती पडल्या. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. अपघात झाल्याचे वृत्त समजताच इतर वाहन चालकांनी त्यांना तात्काळ खेडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. सुषमा निकम यांना येथील डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर यांचा मृतदेह शुभविच्छेदनासाठी कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. शिक्षिका सुषमा निकम यांच्या अपघाताचे आणि अपघाताच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी खेडमध्ये पसरतात खेडमधील अनेक शिक्षकांनी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सायंकाळी उशिरा उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांची आणि शिक्षकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या