JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठा दिलासा! राज्यातील रुग्णसंख्या 20 दिवसांत निम्म्यावर; रिकव्हरी रेट 91.74 %

मोठा दिलासा! राज्यातील रुग्णसंख्या 20 दिवसांत निम्म्यावर; रिकव्हरी रेट 91.74 %

Coronavirus cases in Maharashtra: राज्यात कोरोना रुग्णवाढीत घसरण होत असून रिकव्हरी रेटही सातत्याने वाढत आहे.

जाहिरात

कोरोनाची पहिली लाट (First Wave of Cororna) ओसरण्या आधीच दुसरी लाट सुरु झाली. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची (Corona patient) संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यातच कोरोना बरोबर ब्लॅक फंगस (Black Fungus)चा धोकाही वाढलेला आहे. कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसच्या केस संपूर्ण भारतामध्ये दिसू लागलेल्या आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 मे: राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लावत कठोर निर्बंध लावण्याच्या राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतलेल्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. कारण, राज्यातील वाढत्या कोरोनाच्या (Corona) रुग्णसंख्येला तर ब्रेक लागला असून दैनंदिन रुग्णसंख्येत घसरण तर होत आहे. त्यासोबतच राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही निम्म्याने घसरण झाली आहे. राज्यात गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णसंख्या निम्म्याने घटली आहे. सक्रिय रुग्ण संख्येत मोठी घसरण राज्यात 1 मे 2021 रोजी 63,282 नवीन रुग्णांचे निदान झाले होते आणि त्यावेळी सक्रिय रुग्ण संख्या ही 6,63,758 इतकी होती. तर आता 20 दिवसांनंतर म्हणजेच आज राज्यात 29,644 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सक्रिय रुग्ण संख्या ही 3,67,121 इतकी झाली आहे. इतकेच नाही तर रिकव्हरी रेटही वाढत आहे. 1 मे रोजी राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा 84.24 टक्के इतका होता तर आज राज्यातील रिकव्हरी रेट हा 91.74 टक्के इतका झाला आहे. WHO च्या विधानाने खळबळ! कोरोना मृत्यूंची खरी आकडेवारी आहे फार मोठी आज राज्यात 44,493 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 50,70,801 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91,74 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात 27,94,457 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 20,946 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 555 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 369 मृत्यू हे मागीतल 48 तासांतील तर 186 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. राज्यातील रिकव्हरी रेट 1.57 टक्के इतका आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या