JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Belgaum Lok Sabha by polls election: बेळगावात भाजपचं कमळ फुललं, काँग्रेसचं विजयाचं स्वप्न विरलं

Belgaum Lok Sabha by polls election: बेळगावात भाजपचं कमळ फुललं, काँग्रेसचं विजयाचं स्वप्न विरलं

Belgaum Lok Sabha by polls election result: बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बेळगाव, 2 मे: बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकी (Belgaum Lok Sabha bypolls) साठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी झाली असून निकास समोर आला आहे. ही निवडणूक खूपच अटीतटीची झाली आहे. या निवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी यांनी 2903 मतांनी विजय मिळवला आहे. अटीतटीची झालेल्या या निवडणुकीत अगदी शेवच्या फेरीपर्यंत चुरस कायम होती. शेवटच्या तीन फेऱ्या असताना भाजपच्या मंगला अंगडी यांनी पुन्हा आघाडी घेतली होती. 3500 मतांनी आघाडीवर असलेल्या मंगला अंगडी यांनी अखेर 2903 मतांनी विजय मिळवला. त्यामुळे आता बेळगाववर भाजपचा झेंडा फडकला आहे. बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीत एकूण 10 उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून मंगला अंगडी (Mangala Angadi), काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) तर महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके (Shubham Shelke) हे रिंगणात होते. कर्नाटक राष्ट्र समितीकडून विवेकानंद बाबू घंटी उमेदवार होते. बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ येतात. ज्यामध्ये बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, गोकाक, रामदुर्ग, अरभावी, सौदत्ती यल्लमा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या