JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Datta Jayanti : शेकडो वर्षांचा इतिहास असणारं बीडमधील पहिलं दत्त मंदिर, पाहा Video

Datta Jayanti : शेकडो वर्षांचा इतिहास असणारं बीडमधील पहिलं दत्त मंदिर, पाहा Video

बीड मधील धोंडीपुरा या परिसरामध्ये 125 वर्ष जुने दत्त मंदिर आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 06 डिसेंबर :  बीड   शहराला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नगरी म्हणून ओळखले जाते. याचं शहरांमध्ये अनेक धार्मिक महत्त्व असणारे मंदिर आजही आपल्याला पाहायला मिळतात. यातलंच एक मंदिर म्हणजे  बीड मधील धोंडीपुरा या परिसरामध्ये 125 वर्ष जुने दत्त मंदिर. या ठिकाणी शहरातील व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शन करण्यासाठी गर्दी करतात. दत्त जयंतीनिमित्त या मंदिरात मोठी यात्रा असते.     महाराष्ट्रातील अनेक शहर आणि गावांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. एखाद्या शहराला प्राचीन मंदिरांची पार्श्वभूमी आहे तर कुठे शेकडो वर्षांपूर्वीच्या इतिहासाच्या खुणा आजही पाहिला मिळतात. महाराष्ट्रात आजही बऱ्याच ठिकाणी हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी शेकडो वर्षांपूर्वी बांधलेली अनेक मंदिर पाहायला मिळतात. बीड मध्ये देखील शेकडो वर्षापूर्वीची मंदिरे आहेत. काय आहे मंदिराचा इतिहास बीड शहराला पूर्वी चंपावती नगरी म्हणून ओळखले जायचे. याच शहरावर चंपाराणीचे राज्य होते. त्याच काळामध्ये म्हणजेच आज पासून 125 वर्षांपूर्वी या दत्त मंदिराची शहरातील काही नागरिकांनी एकत्र येत साध्या पद्धतीने उभारणी केली. विशेष म्हणजे बीड शहरातील हे पहिले दत्त मंदिर असल्याचे सांगितले जाते. या दत्त मंदिरात अनेक धार्मिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. नवीन मंदिराचा 1997 रोजी जीर्णोद्धार  झाला. Datta Jayanti : कोल्हापूरच्या या मठात 126 वर्षांपासून अखंड वीणावादन सुरू आहे. काय असते मंदिराची दिनचर्या रोज सायंकाळी सहा वाजायच्या सुमारास मंदिर भक्तांसाठी खुले केले जाते दैनंदिन पूजा अभिषेक देखील केला जातो आणि संध्याकाळी सायन पूजा देखील पार पडते. विष्णुसहस्त्रनामाचा जप देखील या ठिकाणी केला जातो  रोज या नैवेद्य बनवला जातो आणि देवाला समर्पण केला जातो. रात्री मंदिर आठच्या सुमारास मंदिर बंद केले जाते. महाप्रसादाचे आयोजन  दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात येथे साजरी होता. तसेच श्री नरसिंह सरस्वती श्रीपाद वल्लभ दत्त गुरूचा गुरुक्रमण दिन देखील साजरी केला जातो. सर्व दत्ताचे उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी केले जातात. दत्त जन्माच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या