बीड, 1 जून : हाॅटेलमध्ये विविध पदार्थ (Food) नेहमीच आपल्याला खायला मिळतात. प्रत्येक हाॅटेलच्या पदार्थांची चव वेगळी आणि ते तयार करण्याची पद्धतही वेगळी असते. आपापल्या परिसरात काही-काही हाॅटेलच्या पदार्थांची ओळख तयार झालेली असते. खूप दूरुवरून लोक ते पदार्थ खाण्यासाठी येतात. असाच एक बीड शहरात प्रसिद्ध असणारा पदार्थ आपण जाणून घेऊ… त्या पदार्थाला ‘टक्कर’ असे ओळखले जाते. (Famous Takkar Food) सध्या बीड शहरात टक्कर या पदार्थाची जोरदार चर्चा सुरू आहे. याला ‘टक्कर पॅटर्न’ म्हणून ओळखही मिळालेली आहे. बीड शहरातील कारंजा रो़डवर हा पदार्थ विकणाऱ्या दुकानांना अनेक वर्षांचा इतिहास आहे. या हाॅटेल्स मध्ये जिलेबी आणि भजी असे दोन पदार्थ एकत्र करून ग्राहकांना दिले जातात. या एकत्र केलेल्या जिलेबी (Jilebi) आणि भजीच्या (Bhaji) डिशलाच ‘टक्कर’ म्हणून ओळखले जाते. कारंजा रोडवर असणाऱ्या अनेक दुकानांमध्ये हा पदार्थ विकला जातो. वाचा : Diabetes Foods: मधुमेही रुग्णांचा उन्हाळ्यात कसा असावा डाएट; या हंगामात हेल्दी राहण्याच्या टिप्स मागील 60 वर्षांपासून हा पदार्थ विकला जातो. मिर्झा रेहान बेग हा पदार्थ विकण्याचा व्यवसाय आहे. त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. कारंजा रोडवरील ही दुकाने छोटी-छोटी असली तरी ‘टक्कर’ पदार्थ घेण्यासाठी ग्राहकांना मोठी गर्दी असते. टक्कर या खाद्यपदार्थाची चव चाखण्यासाठी लोकांची गर्दी होताना दिसते.