JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बीड : आईच्या डोळ्यादेखत मुलाचं भयानक कृत्य, व्ह्यू पॉईंटवरून मारली खोल दरीत उडी

बीड : आईच्या डोळ्यादेखत मुलाचं भयानक कृत्य, व्ह्यू पॉईंटवरून मारली खोल दरीत उडी

दिनेश नरेश लोमटे, असे या युवकाचे नाव आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 31 ऑक्टोबर : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. आईच्या डोळ्यादेखत व्ह्यू पॉईंटवरून खोल दरीत उडी मारून 20 वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील मुकुंदराज परिसरात धक्कादायक घटना घडली. दिनेश नरेश लोमटे, असे मृत युवकाचे नाव आहे. आईचा काळीज ओढून टाकणारा आक्रोश आणि शोधण्याची घालमेल आरडाओरडा ऐकून पत्रकारांनी धाव घेतली. मात्र, दिनेश मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. या धक्कादायक घटनेनंतर अंबाजोगाई शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण घटना - वनविभागाने तयार केलेल्या व्ह्यू पॉईंटवरून खोल दरीत उडी घेतली. त्यात त्याचा दुदैवी मृत्यू झाला. आज पहाटेच दिनेश आत्महत्या करण्यासाठी मुकुंदराज परिसराकडे धावत सुटला होता. पाठीमागून त्याची आई त्याला रोखण्यासाठी आरडाओरडा करत धावत होती. हे पाहून मॉर्निंग वॉकसाठी त्या परिसरात असणारे पत्रकार यांनी दिनेशला रोखून त्याची समजूत घातली. तो शांत झाल्याचे पाहून त्याला त्याच्या आईजवळ सोडून सर्वजण निघून गेले. मात्र, थोड्याच वेळात दिनेशने बुट्टेनाथ रोडवरील वनविभागाच्या व्ह्यू पॉईंटवरून आईच्या डोळ्यादेखत खोल दरीत उडी मारली. आईचा आरडाओरडा ऐकून पत्रकारांनी पुन्हा तिकडे धाव घेतली. दिनेश मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. दरम्यान, या घटनेनंतर अंबाजोगाई शहर पोलिसांना खबर देण्यात आली. हेही वाचा -  दिराच्या प्रेमात वेडी झाली वहिनी; क्रूरतेचा कळस गाठत पतीसोबत केलं भयानक कृत्य बीडमध्ये पत्नीची हत्या -  ऊसतोडणीला सोबत येत नसल्याने 35 वर्षीय महिलेला पतीसह तिघांनी विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक उघडकीस आली. ही धक्कादायक घटना बीडच्या केज तालुक्यातील जोला येथे घडली. याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राहीबाई अशोक ढाकणे (35) असे या महिलेचे नाव आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या