JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शहीद जवानाच्या पार्थिवासोबत पत्नी आणि लहान मुलगा, 10 तासाच्या प्रवासात साधे पाणीही मिळाले नाही!

शहीद जवानाच्या पार्थिवासोबत पत्नी आणि लहान मुलगा, 10 तासाच्या प्रवासात साधे पाणीही मिळाले नाही!

शहीद जवानाच्या पत्नी आणि मुलाच्याही वाट्याला मोठ्या वेदना आल्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 12 एप्रिल : सोलापूर येथे CISF (ntpc) मध्ये कार्यरत असलेल्या श्यामसिंग सरदारसिंग परदेशी या जवानाचा काल (शनिवारी) हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर शहीद जवानाच्या पत्नी आणि मुलाच्याही वाट्याला मोठ्या वेदना आल्या. कारण लॉकडाऊनमुळे 10 तासाच्या प्रवासात प्यायला ना पाणी मिळालं, ना लहानग्याची भूक भागवण्यासाठी बिस्कीट. वीरपत्नीची ही वेदनादायी कहाणी आता समोर आली आहे. जवानाचे पार्थिव घेऊन जळगावमधील पाचोरा या मूळ गावाकडे जाताना रस्त्याने गाडी बीड मार्गे जात असताना मध्यरात्री एक फोन आला. वीर पत्नी आणि लहान लेकरं आहेत. पिण्यासाठी पाणी अन् काही बिस्कीट असतील तर घेऊन या. लगेचच बीडमधील ‘जिओ जिंदगी’ ग्रुपने पाणी बॉटल बॉक्स आणि काही बिस्किट, फळे नेऊन दिली. अँब्युलन्समध्ये चार जवान आणि शहीद पत्नीसोबत चिमुकला होता. साताऱ्यावरून सोलापूर बीडमार्गे जळगावकडे जात असताना बीडपर्यंत तब्बल दहा तासाचा प्रवास झालेला होता. लॉकडाऊनमुळे या प्रवासात साधे पाणी देखील मिळाले नाही. मात्र देशाची सेवा करणारा पती हृदयविकाराच्या झटक्याने शहीद झाल्यानंतर रडून-रडून डोळ्यातले अश्रू आटून गेले आणि घशाला कोरड पडलेल्या वीर पत्नीसोबत चिमुकल्याला घेऊन गावाकडे जात असताना रस्त्यात पाणी सुद्धा मिळाले नाही.

अगोदरच दुःखाचा डोंगर त्यात हे दुःख समोर आल्यानंतर बीडमध्ये माणुसकी जागवली आणि रात्री बारा 12 च्या दरम्यान पाणी आणि बिस्कीट दिल्यानंतर गाडी जळगावकडे धावली. मात्र लॉकडाऊनमुळे असे दु:ख कित्येकांच्या वाट्याला आलं आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या