औरंगाबाद, 26 ऑक्टोबर : औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्याही प्रमाणात वाढ झाली आहे. दिवाळीच्या पहाटेलाच औरंगाबाद हादरले होते. सुरक्षा रक्षकाला ठार करत जबरी चोरी केली घटना ताजी असतानाच औरंगाबादमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. औरंगाबाद शहरातील मिटमिटा परिसरातील रेल्वे पटरीच्या बाजूने लाकडाच्या दांडुक्याने आणि दगडाने ठेचून अज्ञात व्यक्तीचा खून झाला. अजून पर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. मृत व्यक्ती अंदाजे 35 ते 40 वयोगतील आहे. तसेच मित्र किंवा जवळच्या व्यक्तीने मारल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. एकाच रात्रीमध्ये शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन खून झाल्याने औरंगाबाद हादरले आहे. पहिला खून चोरीच्या उद्देशाने सुरक्षारक्षकाचा तर दुसरा रेल्वे पटरीच्या बाजूने लाकडाच्या दांड्याने ठेचून करण्यात आला. एकाच रात्रीत दोन खून झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तर या धक्कादायक घटनांमुळे शहरवासियांमध्ये खळबळ उडाली आहे. हेही वाचा - औरंगाबादमध्ये पुन्हा टोळक्याचा धुडगूस, फटाके फोडण्यावरून तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, VIDEO पहिली घटना नेमकी काय - औरंगाबाद शहरातील मोंढा नाका येथील बालाजी एंटरप्रायजेसमध्ये जबरी चोरी करण्यात आली. या घटनेत बालाजी एंटरप्रायजेसमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असणाऱ्या व्यक्तीला बांधून ठेवले यावेळी त्यांचा तिथेच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.26) पहाटेच्या सुमारास घडल्याने मोठी खळबळ उडाली. दिवाळी पाडव्याच्या पहाटे अशाप्रकारची घटना घडल्याने औरंगाबाद शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली. औरंगाबाद शहरातील मोंढा नाका येथील बालाजी एंटरप्रायजेसमध्ये जबरी चोरी करण्यात आली. या घटनेत बालाजी एंटरप्रायजेसमध्ये 70 वर्षीय पाशु नावाची व्यक्ती सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती. आज (दि.26) सकाळी 5 वाजेच्या दरम्यान चोरीच्या उद्देशातून 4 जणांनी पाशु यांना बांधून ठेवत चोरी केली. या दरम्यान पाशु यांचा मृत्यू झाला.