सिल्लोड, 07 मार्च: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. याठिकाणी एका नारळावरून (Dispute over one coconut) दोन भावंडात तुंबळ हाणामारी (Brother beat each other) झाली आहे. या भांडणात कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील उडी घेत, लाठ्या काठ्यांनी एकमेकांना झोडपलं आहे. या मारहाणीत अनेकजण जखमी झाले असून दोघांनीही परस्परविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोघांच्या फिर्यादीवरून एकूण सहाजणांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. संबंधित घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा गावात घडली आहे. येथील रहिवासी असणाऱ्या शेख नबी शेख अब्दुल यांच्या शेतात एक नारळाचं झाड आहे. घटनेच्या दिवशी त्यांचा भाऊ शेख अली अब्दुल आणि शमीनाबी शेख अली यांनी एक नारळ तोडून आणला होता. याची माहिती शेख नबी शेख अब्दुल याला कळाली. या क्षुल्लक कारणातून दोन भावांनी भांडायला सुरुवात केली. हेही वाचा- एकतर्फी प्रेमातून गाठला क्रूरतेचा कळस; अल्पवयीन मुलीला पाडलं रक्ताच्या थारोळ्यात पण थोड्याच वेळात हा वाद विकोपाला गेला आणि दोघां भावंडाच्या वादात, चुलते, पुतणे, दीर आणि भावजयी भांडणात उतरले. संबंधित सर्वांनी एकमेकांच्या घरात घुसून लाठ्या काठ्यांनी एकमेकांना बेदम मारहाण केली आहे. एका नारळावरून सुरू झालेल्या या तुंबळ हणामारीत कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांची डोकी फोडली आहेत. दरम्यान एका भावानं दुसऱ्या भावाच्या डोक्यात दगड घालून त्याला रक्तबंबाळ केलं आहे. या विचित्र घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. हेही वाचा- अहमदनगर: चोरी करायला गेला अन् मृत्यूमुखी पडला; साथीदार चोरटेही नाही करू शकले मदत या प्रकरणी दोन्ही गटानं दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या हाणामारीत जखमी झालेल्या सदस्यांवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीचं कारण ऐकून पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.