वृद्ध दाम्पत्य
अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 18 डिसेंबर : औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वृद्ध दाम्पत्याची गळा दाबून हत्या करण्यात आली. औरंगाबादच्या पैठण तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील फारोळा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी वृद्ध दांपत्याची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश करून ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर घटनास्थळी गुन्हे शाखेच्या पथकासह श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञ यांनी पाहणी केली आहे. तर भीमराव खरनाळ आणि शशिकला खरनाळ असे मृत वृद्ध दाम्पत्याचे नावं आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा - मित्रानेच केला घात! आठ जणांचा 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार बीड : बापाचे लेकीसोबत धक्कादायक कृत्य - बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सात वर्षांच्या चिमुकलीवर जन्मदात्या बापानेच बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुलीच्या आत्याने दिलेल्या तक्रारीवरून या नराधम पित्याविरोधात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.